पन्हाळा प्रतिनिधी, शादुद्दीन मुजावर
अशासकीय संघटना आणि समुदाय आधारित संघटना मधील असे दोन प्रतिनिधी ची नेमणूक करण्याची होती. यामध्ये पन्हाळगडावरील सहा उमेदवारांचे फॉर्म आले होते. त्यामध्ये शहाबाज मुजावर, संदीप लोटलीकर, प्रवीण शिंदे, रमेश भोसले, अनुप गवडी, अमितराज पवार,
मा.अमितराज प्रकाश पोवार (स्वीकृत सदस्य)
मुख्याधिकारी नी दि,२४ सप्टेंबर रोजी पन्हाळा नगरपरिषद कार्यालय मध्ये या उमेदवारांची चिठ्ठी पाडून निवड करण्यात आली. यासाठी पन्हाळा विद्यामंदिर पन्हाळा चे दोन विद्यार्थी आणले होते. प्रत्येक विद्यार्थ्याला एक चिठ्ठी उचलण्यासाठी सांगितली गेली. पहिल्या चिठ्ठीत अमितराज प्रकाश पोवार यांचे नाव आले. तर दुसऱ्या चिठ्ठीत शहाबाज शब्बीर मुजावर यांचे नाव आले. मुख्याधिकारी यानी वरील दोन सदस्य निवडून आलेत असे जाहीर केले.
मा. शहाबाज शब्बीर मुजावर (स्वीकृत सदस्य)
तसेच पन्हाळा नगरपरिषद पथ विक्रेता समिती सदस्य निवडणूक मतदान दिनांक, २९ ऑगस्ट २०२४ रोजी,आठ जागा पैकी पाच जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत, अनुसूचित जमाती प्रवर्ग इतर मागास वर्ग महिला प्रवर्गातील जागासाठी एकही अर्ज उपलब्ध न झाल्याने या जागा रिक्त राहिल्या आहेत. पन्हाळा पथ विक्रेता समिती सदस्य निवडणूक साठी पन्हाळा शहरातील १२४ मतदार झाले होते. अल्पसंख्यांक प्रवर्गातील एका जागेसाठी थेट लढत झाली होती. अल्पसंख्यांक प्रवर्गातील एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात उतरले त्यापैकी बशीर बालेखान मुतवल्ली यांना ६० इतकी मते प्राप्त झाली तर शहाबाज शब्बीर मुजावर यांना ५७ मतं पडली होतीत. तर ७ मते बाद झाली होतीत मुजावर याच्या निसटता पराभव झाला होता. अल्पसंख्यांक प्रवर्गातून बशीर बालेखान मुतवल्ली त्यावेळी विजयी झाले होते.
अंतर्गत आठ (८) पथविक्रेता यांचे सदस्यांच्या निवडणूक सन २०२४ कार्यक्रम प्रवर्ग निहाय बिनविरोध विजयी उमेदवार पुढील प्रमाणे झाले होते, सर्वसाधारण प्रवर्ग- सुभाष मारुती गवळी, राजेंद्र आनंदराव भोसले (बिनविरोध), सर्वसाधारण महिला – वंदना प्रकाश भोसले ( बिनविरोध), अनुसूचित जाती- शितलकुमार चंद्रकांत गवंडी. (बिनविरोध) दिव्यांग महिला ,सिता राजू खोत (बिनविरोध) वरील सर्व सदस्य हे बिनविरोध झाले होते.
या पथ विक्रेता समिती सदस्य निवडणूक साठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चेतनकुमार माळी, आनंदा रेडेकर ,नंदकुमार कांबळे, तानाजी वामन ननावरे,यांनी काम पहिले