मुख्य संपादक : शिवाजी तुकाराम शिंगे
_____________७८ ७५ ७० ७७ ७८______________
कोल्हापूर, प्रतिनिधी/ समाजात ‘आहे रे’ व ‘नाही रे’ असे दोन वर्ग असून समाजातील या विषमतेवर अंकुश ठेवण्यासाठी शासकीय योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. असे आपले वैयक्तिक मत असून ‘नाही रे’ वर्गातील शेवटच्या घटकाला या योजनांचा लाभ मिळायला हवा असल्याचे प्रतिपादन उच्च न्यायालयाचे (मुंबई) न्यायमूर्ती श्याम चांडक यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका कोल्हापूर व इचलकरंजी, छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय व पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा महाशिबिर तथा शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या, शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृती भवन येथे आयोजित करण्यात आला होता. याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (कोल्हापूर) श्रीमती कविता अग्रवाल, जिल्हा न्यायाधीश श्रीमती पी एफ सय्यद, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मनपा आयुक्त के मंजूलक्ष्मी, इचलकरंजी मनपा आयुक्त ओमप्रकाश दिवटे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक (गडहिंग्लज) निकेश खाटमोडे -पाटील, कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड सर्जेराव खोत, महाराष्ट्र – गोवा बार असोशिएशनचे सदस्य ॲड विवेकानंद घाडगे, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव सुधीर इंगळे आदी उपस्थित होते तर,
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस एस इंगळे तर आभार प्रदर्शन कनिष्ठ न्यायाधीश श्रीमती मोनाली गावडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्रमुख प्राचार्य अभयसिंह साळुंखे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी, विधीज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.