विशेष वृत्त डी. एस. कोंडेकर दि.३०,महापुराचा फटका बसलेल्या पूरग्रस्तांचे संबंधित यंत्रणेकडून पंचनामे झाले; परंतु अनेकांना अद्यापि नुकसानभरपाई मिळाली नाही. या पूरग्रस्तांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी कोल्हापूर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्याकडे निवेदनाद्वारे आठ दिवस अगोदर केली होती. आठ दहा दिवस होऊनही पूर्वाधित नागरिकांना अद्याप अनुदान मदत मिळालं नाही.
याची पाठपुरावा म्हणून शिवसेना नेते, जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा पूरबाधित नागरिक व्यावसायिक शिष्ट मंडळ जिल्हाधिकारी मा. अमोल येडगे यांची भेट घेऊन लवकरात लवकर व्यवसायिक/ नागरिकांना पूरग्रस्तांना नुकसानभरपाई मिळावी असे विनंती करण्यात आली.
यावेळी जिल्हा अधिकारी मा. अमोल येडगे
यांनी आपले निवेदन द्वारे आपली भावना शासनाकडे या आदिच आम्ही कळवले आहेत. काही पंचनामे काही त्रुटी राहिल्या होत्या त्या पूर्तता करून आम्ही पुन्हा फेरप्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. लवकरच एक चार दिवसात शासनाचे आदेश येताच शासनाने ठरवून दिलेल्या अनुदान मदत तुम्हाला मिळून जाईल असे त्यांनी सांगितले.
शिवसेना उपनेते शशी (भाऊ) बिडकर यांनी पूर बाधित व्यवसायिक नागरिक यांचे रितसर आपण पाठपुरावा करत असून लवकरच सर्वांना मदत मिळेल संयम ठेवा असे सांगितले.
यावेळी वर्कर असोसिएशनचे अध्यक्ष धोंडीराम चोपडे, विष्णू सुतार, सागर पुरेकर, सतीश उपाध्ये, पप्पू कोंडेकर, जयदीप पडवळे, डि. एस. कोंडेकर, शिवाजी शिंगे, आदी पूरबाधित भागातील सर्व व्यापारी व नागरिक उपस्थित होते.