आरोग्य विषयक जिल्हास्तरावरील बैठकीत सूचना,
जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान शोध मोहिम प्रभावीपणे राबवा - सिईओ, कार्तिकेयन एस.

0 0

Share Now

Read Time:7 Minute, 43 Second

कोल्हापूर, दि.29 : मुलींचा जन्मदर घसरत असल्याने शासनाने आता गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या टोळीविरोधात विशेष मोहिम राबवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही गर्भलिंग चाचणी रोखण्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकले जातात तसेच स्टिंग ऑपरेशनही केले जात आहे. प्रभावीपणे अवैध गर्भलिंग निदान शोध मोहिमेला गती द्या अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी जिल्हास्तरावरील बैठकीत दिल्या. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुप्रिाया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरूद्ध पिंपळे, डॉ.हर्षला वेदक, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर, डॉ.फारूख देसाई यांच्यासह संबंधित विषयाचे समिती सदस्य, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, एमएस उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, जिल्ह्यातील जन्मावेळीचे स्त्री-पुरुष प्रमाण अतिशय असमाधानकारक असून यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. अवैध गर्भलिंग निदान तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवून तीन महिन्यानंतर तपासणी करण्याऐवजी अचानक भेटी देऊन वारंवार सोनोग्राफी करणाऱ्या ठिकाणी तशा प्रकारच्या चाचण्या होतात का याची तपासणी करा. यावेळी सोबत रेडिओलॉजिस्ट घेऊन जा. त्या मशीनचे एफ फॉर्म तपशीलवार पहा. ही मोहीम राबवीत असताना आरोग्य विभाग तसेच शासकीय दवाखाने यांनी समन्वयाने कामकाज करा. मोठ्या प्रमाणात हल्ली पोर्टेबल मशीनद्वारे गर्भलिंग निदान तपासणी केली जाते याचा शोध घ्या. तसेच अवैध मार्गाने गर्भपाताची औषधे विकली जातात का याचीही तपासणी करा. यासाठी ठिकठिकाणी छापा टाकून एजंट तसेच डॉक्टर यांचे नेटवर्क शोधून काढून त्यांच्यावर कडक कारवाई करा. ही मोहीम यशस्वी करायची असेल तर आरोग्य विभागातील संबंधित यंत्रणेला प्रत्यक्ष काम करावेच लागेल. गर्भपातासाठी आलेल्या महिलांचा इतिहास जाणून घ्या. ज्या ठिकाणी बंद मशीन्स आहेत त्या ठिकाणी त्या मशीन्स नेमक्या बंद आहेत किंवा नाहीत याची खात्री करा. या मोहिमेबाबत जिल्ह्यात जनजागृती करा अशा सूचनाही त्यांनी उपस्थितांना दिल्या.

बोगस डॉक्टर तपासणी मोहिमेलाही गती द्या असे त्यांनी बैठकीत सांगितले. प्रत्येक तालुक्यामध्ये या बैठका नियमित स्वरूपात घेणे अपेक्षित आहे. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी ही बैठक झाली पाहिजे. या तपासणीसाठी एक तपासणी सूची तयार करून संबंधित तपासणी अधिकाऱ्यांना द्या. स्थानिक स्वराज्य संस्थेत नव्याने दवाखाना सुरू होत असताना त्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देताना संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याचा किंवा जवळील शासकीय दवाखान्यातील प्रमुखाचे ना हारकत प्रमाणपत्र घ्या. याबाबत ग्राम स्तरावर काही चुकीचे डॉक्टर्स आढळून येत असतील किंवा ग्रामस्थांच्या लक्षात आल्यास याबाबतचा तपशील प्राधान्याने पोलीस पाटील यांनी देणे बंधनकारक आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बोगस डॉक्टरबाबत स्वतंत्र अशी ‘तक्रारपेटी’ ठेवा. या बोगस डॉक्टर बाबतची तपासणी मोहीम 31 मार्चपर्यंत पूर्ण करा असे निर्देश यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले.

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण समिती च्या बैठकीत ही मोहीम राबवीत असताना जिल्हा शल्य चिकित्सक आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी एकत्रित तपासणी मोहीम राबवा. शासकीय कार्यालयात तसे अधिकारी कर्मचारी आढळून आल्यास त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई केल्याचे तपशील पुढील वेळी पासून सादर करा. पोलीस विभाग तसेच आरोग्य विभागाने आपल्या दंडात्मक कारवाईच्या संख्येत वाढ करा. उपस्थित अशासकीय सदस्यांनी शालेय स्तरावरील व परिसरातील युवकांमध्ये वाढत्या तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे मुद्दे मांडले व त्यावर उपाययोजना राबवण्यासाठी विनंती केली. यावेळी बैठकीत जीबीएस या आजारावरती चर्चा झाली. शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जीबीएस बाबत आवश्यक माहिती लोकांना द्या. जिल्ह्यात तीन केसेस मिळाले आहेत त्या ठिकाणच्या परिसरातील पाण्याचे नमुने घेऊन संबंधित पाण्याचे स्त्रोतही तपासा अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या. क्षयरोग निर्मूलन अभियानांतर्गत संधीग्ध रुग्णांच्या एक्स-रे संख्या वाढवा. जिल्ह्यात क्षयमुक्त अभियानासाठी मोहीम राबवून टीबीमुक्त गावाबरोबरच टीबीमुक्त जिल्हा लवकरात लवकर आपणाला करायचा आहे त्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची त्रैमासिक बैठक झाली. यात जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी माहिती सादर केली. या बैठकीत खाजगी दवाखानात्यातील एचआयव्ही बाधितांची माहिती जिल्हा केंद्रास मिळावी. यामुळे पुढिल एचआयव्ही संक्रमण रोखण्यास उपाययोजना राबविता येतील असे त्या म्हणाल्या. तसेच या बैठकीत कोल्हापूर शहरातील वेश्या व्यवसायातील महिलांच्या समस्यांवरही चर्चा झाली.

____________________जाहिरात_____________________

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *