
कोल्हापूर दि,२० सौंदती डोंगर, कर्नाटक येथील श्री रेणुका देवीच्या सौंदत्ती यात्रेसाठी एस.टी. भाडे आणि खोळंबा आकारात विशेष सवलत देण्याचा निर्णय परिवहन महामंडळाने घेतला असून, यासाठी विशेष पाठपुरावा करून भाविकांना दिलासा दिल्याबद्दल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांचा कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना आणि करवीर निवासिनी रेणुका भक्त संघटना यांचेवतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष अच्युतराव साळोखे, उपाध्यक्ष सरदार जाधव, कार्याध्यक्ष सुभाष जाधव, सरचिटणीस तानाजी चव्हाण, करवीर निवासिनी रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष प्रदीप साळोखे, उपाध्यक्ष किरण मोरे, कार्याध्यक्ष उदय पाटील, सचिव प्रशांत खाडे, चेतन पवळ, युवराज मुळे, गजानन विभूते, दयानंद घबाडे, आकाश पाटील, केशव माने, संजय मांगलेकर, सुरेश विरंगुळे, दिलीप परीट, विजय पाटील, अनिल देवणे आदी रेणुका भक्त संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
==========जाहिरात===========
