हमीदवाडा ग्रामपंचायतीला मनसेचा दणका: गाव तळ्यातला गाळ वाजत – गाजत आणून टाकला ग्रामपंचायत हमिदवाडा कार्यालयाच्या दारात…!

हमिदवाडा प्रतिनिधी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन करण्यात आले. दिनांक २२/०२/२०२२ रोजी ग्रामपंचायत हमिदवाडा यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तळ्यातील गाळ काढण्यास संदर्भात लेखी निवेदन दिले […]

यंदा जोतिबाचा गुलाल उधळणार, भाविकांना निर्बंध नाहीत ना. सतेज (बंटी) पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची ‘चैत्र यात्रा’ गेली दोन वर्ष कोरोनाच्या संकटामुळे झालेली नाही. मात्र यंदा १६ एप्रिल रोजी होणाऱ्या या यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज जोतिबा मंदिर परिसराला भेट देऊन यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला. […]

यंदा वाढणारी भाविकांची संख्या लक्षात घेवून प्रशासनाने यात्रा नियोजन करावे : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२८ : गेली २ वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. यंदाच्या वर्षी या प्रादुर्भावात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे प्रती वर्षाच्या तुलनेत यंदा अधिकचे ३० टक्के भाविक जोतिबा यात्रेसाठी येण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात […]

२ उमेदवारांची माघार : १५ उमेदवार निवडणूक रिंगणात….!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२८ : २७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी २ उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले असून १५ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर […]

२७६-कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक, आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे : निवडणूक निरीक्षक राजू नारायण स्वामी

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२८ : २७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ पोट निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, आचारसंहितेचा भंग झाल्याचे आढळून आल्यास ऑनलाईन तक्रार दाखल करावी, अशा सूचना कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोट निवडणुकीचे निवडणूक निरीक्षक […]

कोल्हापूर विधानसभा मतदारसंघात मतदान करण्यासाठी १२ एप्रिलला सुट्टी जाहीर…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. २८ : भारत निवडणूक आयोगाने २७६ कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या रिक्त असलेल्या जागी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या अनुषंगाने कोल्हापूर मतदारसंघात दिनांक १२ एप्रिल २०२२ रोजी मतदानाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. या […]

धर्माच्या आचरणाचून अध्यात्माचा अनुभव येतो : प. प. श्री विद्यानृसिंह भारती स्वामी..!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. २७ : धर्माच्या आचरणाचून अध्यात्माचा अनुभव येतो, असे प्रतिपादन प. प. श्री विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी आज केले. मराठी महिन्यांमध्ये नूतन वर्ष गुढीपाडव्याला सुरुवात होते. त्या दृष्टीने करवीर पीठाच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून […]

२७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ पोटनिवडणुक: १७ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध…!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. २५ : २७६-कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोट निवडणूक २०२२ साठी १७ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे आज झालेल्या छाननीत वैध ठरली तर २ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे अवैध ठरली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी दिली. […]

२७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूक : आजअखेर एकूण १९ उमेदवारांचे २७ नामनिर्देशनपत्र

कोल्हापूर/प्रतिनिधी : २७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी आज १४ उमेदवारांनी १६ नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. आज जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव (इंडियन नॅशनल काँग्रेस), सचिन प्रल्हाद चव्हाण (इंडियन नॅशनल काँग्रेस), बाजीराव सदाशिव नाईक (अपक्ष), करुणा […]

पेड न्यूज व उमेदवाराच्या जाहिरात खर्चावर माध्यम सनियंत्रण व प्रमाणीकरण समितीची करडी नजर : जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर/प्रतिनिधी : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २७६ कोल्‍हापूर उत्‍तर विधानसभा मतदार संघासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार तसेच अपक्ष उमेदवारांनी त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व सोशल […]