पेठवडगाव येथील खरेदी-विक्री प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद; शर्विकाताई उर्फ पुनमताई तोडकर यांची प्रमुख उपस्थिती

कोल्हापूर प्रतिनिधी.  पेठवडगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या खरेदी-विक्री प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनासाठी शर्विकाताई उर्फ पूर्णम ताई तोडकर यांना प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या शेती औषध फवारणी पंप योजनेची सविस्तर माहिती दिली. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि योजनेच्या लाभासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी महिला सक्षमीकरणावर भाष्य करताना त्या म्हणाल्या, “स्त्री सक्षम झाली तर कुटुंब सक्षम होते, कुटुंब सक्षम झाले तर समाज सक्षम होतो आणि समाज सक्षम झाला तरच देशाच्या परिवर्तनाला खरी गती मिळते.” महिलांनी स्वावलंबी होऊन समाजाच्या विकासात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

या प्रदर्शनामध्ये संस्थेच्या वतीने विशेष स्टॉल उभारण्यात आला असून, या स्टॉलवर इच्छुक शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचवणे आणि त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

शेतकऱ्यांचे हित, त्यांची आर्थिक प्रगती आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास यासाठी संस्थेचा सेवाभावी प्रवास यापुढेही असाच सुरू राहील, असा विश्वास आयोजकांच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

===========जाहिरात==============

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *