आश्रमशाळांच्या सुविधांमध्ये सुधारणा आणि वंचित विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार
पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP २०२०) च्या अंमलबजावणीच्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी करू नयेत, तसेच आश्रमशाळांमधील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावावा, यासाठी शासनस्तरावर ठोस पाठपुरावा करणार असल्याचा निर्धार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांनी व्यक्त केला.
प्राध्यापकांचे रोजगारहित सुरक्षित ठेवून विद्यार्थीसंख्या, अध्यापनाचा कार्यभार आणि शैक्षणिक गरजांनुसार पदनियोजन करावे. तसेच आश्रमशाळांमध्ये स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, सुरक्षित निवास आणि शैक्षणिक सुविधांमध्ये सुधारणा करून तृतीय-पक्षीय लेखापरीक्षणातील (Third-Party Audit) त्रुटी कालमर्यादेत दूर कराव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली.
प्राध्यापकांचे रोजगारहित आणि वंचित विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवून देणे, हीच आपली प्राथमिकता असल्याचे कौस्तुभ गावडे यांनी स्पष्ट केले.

