वाढदिवसाच्या शुभेच्छांमध्ये एकच मागणी… ‘साहेब, आता मंत्री व्हाच!’
कोल्हापूर प्रतिनिधी, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात सध्या एका विषयाची जोरदार चर्चा रंगली आहे. ती म्हणजे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात क्षीरसागर यांना मंत्रीपदाची संधी मिळणार का?
आमदार राजेश क्षीरसागर यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकारांची विशेष बैठक घेऊन संवाद साधला. यावेळी त्यांनी गेल्या चार दशकांतील राजकीय प्रवासाचा आणि शिवसैनिक म्हणून केलेल्या कार्याचा आढावा मांडला. कोल्हापूरच्या विकासासाठी विविध स्तरांवर काम करताना आपण कुठेही कमी पडलो नसल्याची भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली.
चार दशकांची राजकीय वाटचाल, पक्षनिष्ठा आणि कोल्हापूरच्या विकासासाठी केलेल्या कामांचा उल्लेख करताना आगामी मंत्रिमंडळ फेरबदलात आपल्याला मंत्रीपदाची संधी मिळण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. त्यांची ही मुलाखत विविध प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध होताच समर्थकांमध्ये नव्या चर्चेला सुरुवात झाली.
शिवसैनिक, कार्यकर्ते, हितचिंतक आणि निकटवर्तीयांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छांसोबतच ‘यंदा साहेबांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे’, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे यंदाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांमध्येही मंत्रीपदाची अपेक्षा आणि राजकीय चर्चेचा सूर अधिक ठळकपणे ऐकायला मिळत आहे.
एकूणच, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवशी समर्थकांच्या शुभेच्छांमध्ये भेटवस्तूची अपेक्षा एकच — साहेबांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडावी!
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
============जाहिरात=============

