साके येथील निलेश पाटील यांच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी करा; ग्रामस्थांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

नरेंद्र मोदी विचार मंचच्या प्रदेशाध्यक्षा पूनम ताई तोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन सादर; डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत तपासाची मागणी 

कोल्हापूर प्रतिनिधी, साके येथील निलेश पाटील यांच्या आकस्मिक व संशयास्पद मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

नरेंद्र मोदी विचार मंचच्या प्रदेशाध्यक्षा पूनम ताई तोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन सादर करण्यात आले. निलेश पाटील यांच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी संशयितांचे मोबाईल जप्त करून त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात यावेत, तसेच या प्रकरणाचा तपास डीवायएसपी दर्जाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

या प्रकरणातील सर्व बाबींची बारकाईने तपासणी करून सत्य परिस्थिती समोर आणावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. तसेच निलेश पाटील यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *