गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल अनपेक्षित आणि धक्कादायक आहे. मात्र सभासदांनी दिलेला कौल मान्य असून, महायुती म्हणून आम्ही या निकालाचं परीक्षण करू आणि आत्मचिंतन करू. दूध उत्पादक शेतकऱ्यांना यापुढेही चांगला दर मिळावा आणि संघाची प्रगती व्हावी, यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. त्यामुळे योग्य कारभाराला सहकार्य असेल मात्र चुकीच्या धोरणांना नक्कीच विरोध असेल. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाला न्याय देण्यासाठी यापुढेही महायुती म्हणून आम्ही नेहमीच सकारात्मक असणार आहोत.
खासदार धनंजय महाडिक……
नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांची प्रतिक्रिया
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दूध उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी दिलेला निकाल आम्ही स्वीकारत आहोत.
या निवडणुकीत महायुतीमध्ये शेवटपर्यंत सुरू असलेली भांडणे आणि त्यानंतर झालेली युती कदाचित लोकांना आवडलेली नसावी. बाद झालेली मतेही लक्षणीय आहेत. या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन. गोकुळ दूध संघाचे नवीन संचालक मंडळ कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल साडेपाच लाख शेतकरी कुटुंबांचे कल्याण साधेल अशा शुभेच्छा. सबंध कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण कल्याणाच्या भूमिकेतून गोकुळ दूध संघाच्या उत्कर्षासाठी लागेल ते सहकार्य करू.


