सौ. अंजली महाडिक यांच्या हस्ते नवीन कपड्यांचे वितरण; सामाजिक उपक्रमातून दिवाळीचा आनंद द्विगुणित

खासदार धनंजय महाडिक यांच्यावतीने देवस्थान समितीच्या २१० कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट!

सौ. अंजली महाडिक यांच्या हस्ते नवीन कपड्यांचे वितरण; सामाजिक उपक्रमातून दिवाळीचा आनंद द्विगुणित

कोल्हापूर : दीपावली सणाचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर फुलावा, या उद्देशाने खासदार धनंजय महाडिक यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. याच उपक्रमांतर्गत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या २१० कर्मचाऱ्यांना नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले.

सौ. अंजली विश्वराज महाडिक यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत कपड्यांचे वितरण करण्यात आले. यामध्ये पुरुष कर्मचाऱ्यांना शर्ट व पँटचे कापड, तर महिला कर्मचाऱ्यांना साड्यांचे वाटप करण्यात आले.

यापूर्वी कसबा बावडा येथील राजाराम कारखाना कार्यस्थळावर ऊसतोडणी कामगारांना फराळ व कपड्यांचे वाटप करण्यात आले होते. दिवाळीच्या निमित्ताने समाजातील विविध घटकांपर्यंत आनंद पोहोचविण्याचा या उपक्रमांचा उद्देश आहे.

यावेळी देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्यासह समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *