MEDIA CONTROL ONLINE
मुंबई : आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने भरपूर प्रयोग केले होते. हे प्रयोग करण्यामागे खेळाडूंची विश्वचषकासाठी चाचपणी घेणे, हे एकमेव ध्येय होते. भारतीय संघाने गेल्या ९ महिन्यांमध्ये तब्बल सात कर्णधारही बदलल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे कायम ठेवण्यात आले आहे. विश्वचषकासाठी अष्टपैलू खेळाडूंवर भारतीय निवड समितीने जास्त भर देण्याचे ठरवले आहे. कारण अष्टपैलू खेळाडू हे संघासाठी बाराव्या खेळाडूचे काम करत असतात. हार्दिक पंड्याने ही गोष्ट आशिया चषक स्पर्धेत करून दाखवली होती. रवींद्र जडेजा हा भारताचा हुकमी अष्टपैलू खेळाडू असल्याचे समजले जाते. पण जडेजाच्या गुडघ्यांवर शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. त्यामुळे तो या विश्वचषकात खेळणार की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. पण यावर आता बीसीसीआयने स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे.
विश्वचषकासाठी भारतीय संघ खालील प्रमाणे आहे.
१५ सदस्यीय टीम इंडिया- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सुर्यकुमार यादव, दिपक हुडा, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग आणि आर अश्विन.