Media control news network
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घडवण्यात माता रमाबाई आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा आहे, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत घेतलेल्या शिक्षणामुळेच जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख निर्माण झाली याचा पाया ग्रंथांमधून घातला गेला, वैचारिक पिढी घडवण्यासाठी ग्रंथ आणि पुस्तकच नव्या पिढीसाठी मार्गदर्शन ठरतील असं प्रतिपादन वंदूरच्या सरपंच धनश्रीदेवी घाटगे यांनी व्यक्त केलं, वंदूर ता. कागल येथे धम्मचक्र प्रवर्तक दिनानिमित्त माता रमाबाई आंबेडकर वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या आमदार फंडातून वंदूर ता. कागल येथील बसस्थानक परिसरात उभारण्यात आलेल्या इमारतीत रमाबाई आंबेडकर वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आलं. वंदूर ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आणि लोकसहभागातून वर्तमानपत्रे, साप्ताहिक, नियतकालिके, नोकरीविषयक मासिके या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. वाचनीय पुस्तकातून नव्या पिढीने प्रेरणा घेऊन आपलं आयुष्य यशस्वी करावं असं आवाहन यावेळी मान्यवरांनी केलं. कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि माजी उपसरपंच बाळासाहेब पाटील, उपसरपंच सागर बागणे, डॉ. दिलीप रणदिवे, माजी सरपंच सारिका कांबळे,
मालुबाई कांबळे, माजी उपसरपंच रामचंद्र लोकरे, डॉ. संभाजी रणदिवे, तानाजी बागणे, पारिसा जंगटे, संभाजी भोसले, महावीर जंगटे, उत्तम कांबळे, वैशाली कांबळे, पल्लवी कांबळे, यशवंत कांबळे, प्राण कांबळे, दयासागर कांबळे, दयानंद कांबळे, किरण कांबळे वंदूर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिदास कांबळे यांनी केलं तर आभार केशव कांबळे यांनी मानले.
==========={ जाहिरात}============