कोल्हापूर: महागाईचा आग, वाढेलेले गॅस दर, अन्नधान्यांवरील जीएसटी बंद केला पाहिजे, अशा विविध मागण्यांसाठी आज शिवसेनेकडून कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय होता.शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. शिवसेनेकडून विविध मागण्या धडक मोर्चामध्ये करण्यात आल्या.
अन्न सुरक्षा योजनेतील नोकरदार, पेन्शनधारक यांच्याबरोबरच उत्पन्न वाढलेल्या लोकांनी रेशनवरील धान्य बंद करण्याचा निर्णय स्वतःहून घेऊन गोरगरिबांना याचा लाभ मिळवून द्यावा, या हेतूने प्रशासनाकडू मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, याला कोल्हापूर जिल्ह्यातून कडाडून विरोध होत आहे
रेशनचा अधिकार कायम ठेवण्यात यावा, रेशनसाठी उत्पन्नाची किमान मर्यादा २ लाख करण्यात यावी, उत्पन्नावर आधारित रेशन कार्ड बंद करू नयेत, केशरी कार्डावर गहू , तांदुळ, डाळ देण्यात यावी, अन्नधान्यावरील जीएसटी रद्द करा, दसरा, दिवाळीला रेशनवर खाद्यतेल, डाळ, साखर द्यावी, बायोमेट्रिक पद्धत बंद करा, रेशन प्रशासनातील भ्रष्टाचार आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.