हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शहरात १२ ठिकाणी महाआरोग्य शिबिरे संपन्न…..!

0 0

Share Now

Read Time:8 Minute, 18 Second

कोल्हापूर : राजकारणात तळपते आणि रोखठोक आक्रमक विचार मांडणारे पण प्रत्यक्षात मात्र खूप प्रेमळ आणि कुटुंबवत्सल असणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आम्हा शिवसैनिकांचे दैवत आहेत. कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या स्थापनेपासूनचा मी शिवसैनिक आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे आचरण करून ८० टक्के समाजकारण आणि २० राजकारण या सूत्राचा अवलंब करून केलेल्या लोकोपयोगी कामामुळेच राजकारणात यशस्वी झालो आहे. अनेकवेळेला शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेच्या प्रश्नासाठी लढण्याचे आदेश दिलेच यासह यशस्वी झालेल्या लोकहिताच्या आंदोलनासाठी शाबासकी दिली. प्रसंगी सीमाप्रश्नी केलेल्या आंदोलनात स्वत: संवाद साधून पाठराखण करीत लढण्याचे पाठबळ दिले. शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या विचारांची शिदोरी आम्हा शिवसैनिकांसोबत असून, त्यानुसारच बाळासाहेबांच्या शिवसेनेची वाटचाल सुरु आहे, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंती निमित्त बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने शहरात १२ ठिकाणी महाआरोग्य शिबिरांचे आज आयोजन करण्यात आले होते. सकाळी शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस श्री.राजेश क्षीरसागर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, महिला आघाडी महानगरप्रमुख सौ.मंगलताई साळोखे, समन्वयक श्रीमती पुजाताई भोर, सौ.पूजा कामते, युवासेना शहरप्रमुख पियुष चव्हाण, शैलेश साळोखे, शिवसेना उपशहरप्रमुख सम्राट यादव, कपिल सरनाईक, निलेश हंकारे, रियाज बागवान, विभागप्रमुख ओंकार परमणे, उदय पोतदार, रविंद्र सोहनी, क्रिपालसिंग राजपुरोहित, बबनराव गवळी आदी उपस्थित होते. यानंतर शिवसेना विभाग शनिवार पेठ बाजारगेट यांच्यामार्फत आयोजित जोशी गल्ली चौक, शनिवार पेठ येथील महाआरोग्य शिबिराची सुरवात करण्यात आली. यावेळी तपासणीसाठी आलेल्या नागरिकांचीराजेश क्षीरसागर यांनी आपुलकीने विचारपूस केली.

            यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनाप्रमुखांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ते पुढे म्हणाले, शिवसेनाप्रमुखांच्या मुशीत तयार झालेले आणि त्यांचा लाडका शिवसैनिक धर्मवीर आनंद दिघे आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या तालमीत तयार झालेला शिवसैनिक म्हणजे सध्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे. सद्या शिवसेनेचे मुख्यमंत्री हे राज्याची धुरा सांभाळत आहेत. असा एकही क्षण जात नाही की, शिवसेनाप्रमुखांची आठवण आम्हा शिवसैनिकांना येत नाही. सर्वसामान्यांना न्याय देणे ही शिवसेनाप्रमुखांची शिकवण घेऊनच आम्ही पुढे चालत आहोत. मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने कमी कालावधीत जे काही लोकहिताचे निर्णय घेतले ते शिवसेनाप्रमुखांच्या शिकवणीमुळेच शक्य झाले. शिवसेनाप्रमुखांच्या विचारानुसारच बाळासाहेबांच्या शिवसेनेची वाटचाल सुरु असून, ही वाटचाल अशीच अखंडित राहून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे, समाजहिताचे काम आम्ही शिवसैनिक करू आणि हीच खरी शिवसेनाप्रमुखांना आदरांजली असेल, असे प्रांजल मतही राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले.

आज सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत शहरात १२ ठिकाणी महाआरोग्य शिबिरांचे प्रयोजन करण्यात आले होते. महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ठ रुग्णालयांच्या सहभागाने विविध आजारांवरून वर्गीकरण करून प्रत्येक ठिकाणी ४ ते ५ रुग्णालयांच्या वैद्यकीय पथकाकडून नागरिकांना विविध आजारांशी निगडीत तपासणी, औषधोपचार व मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराचा लाभ शहरातील हजारो नागरिकांनी घेतला. यामध्ये जोशी गल्ली चौक, शनिवार पेठ येथे शिवसेना विभाग शनिवार पेठ बाजारगेट, जुना बुधवार पेठ तालीम हॉल, जुना बुधवार पेठ येथे शिवसेना विभाग जुना बुधवार पेठ, ग.गो.जाधव शाळा, शुक्रवार पेठ येथे शिवसेना विभाग शुक्रवार पेठ व उत्तरेश्वर पेठ, सिंहगड, शिवसेना विभागीय कार्यालय, मंगळवार पेठ येथे शिवसेना विभाग मंगळवार पेठ, शिवाजी मंदिर, शिवाजी पेठ येथे शिवसेना विभाग शिवाजी पेठ, शिवनेरी, शिवसेना विभागीय कार्यालय, कसबा बावडा येथे शिवसेना विभाग कसबा बावडा, लोट्स मिनी हॉल, रंकाळा टॉवर येथे शिवसेना विभाग दुधाळी, शेलाजी वनाजी विद्यालय, लक्ष्मीपुरी येथे शिवसेना विभाग लक्ष्मीपुरी, महावीर उद्यान, जिल्हाधिकारी कार्यालय समोर येथे शिवसेना विभाग शाहुपुरी, स्वामी स्वरूपानंद हॉल, लाईन बझार येथे शिवसेना विभाग लाईनबझार, सरस्वती चुणेकर विद्यामंदिर, सागरमाळ येथे शिवसेना विभाग प्रतिभानगर, जुनी शाळा, दुसरा बस स्टॉप शाहू चौक, लक्षतीर्थ वसाहत येथे शिवसेना विभाग लक्षतीर्थ यांच्यावतीने शिबिरांचे नेटके नियोजन करण्यात आले होते. यामध्ये जनरल फिजिशियन, हृदयरोग तपासणी, मेंदू विकार तपासणी, किडनी विकार तपासणी, रक्त तपासणी, नेत्र तपासणी आदी आजारांशी निगडीत तपासणी, औषधोपचार व मार्गदर्शन करण्यात आले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *