राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर संपन्न….!

0 0

Share Now

Read Time:5 Minute, 12 Second

विशेष वृत्त कौतुक नागवेकर 

सांगली: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.आ. जयंत पाटील  यांच्या वाढदिवसानिमित्त,महाआरोग्य शिबिर सागलीवाडी येथील ल.पा.पाटील विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.आ.जयंतरावजी पाटील साहेब व उदघाटक महापालिकेचे आयुक्त मा.सुनिल पवार हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्यातर्फे आयोजित महाआरोग्य शिबिरामध्ये येणाऱ्या प्रत्येकाची मोफत तपासणी व्हावी,औषधे-उपचार मिळावे हा प्रामाणिक उद्देश ठेवूनच या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीरात नागरिकांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आरोग्य सुविधांचा लाभ घेतला.आवश्यकतेनुसार सेवा-सुविधा देण्याचा सकारात्मक प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.याचा मला व आमच्या संपूर्ण सहकाऱ्यांना देखील निश्चितच आनंद आहे.या महाआरोग्य शिबिरातून जवळपास २१६०० रुग्णांची मोफत तपासणी करून उपचार करण्यात आले.

या शिबिरामध्ये कॅन्सर,प्लॅस्टिक सर्जरी,ह्रदयाचे आजार,पोटाचे विकार ,हाडाचे शस्त्रक्रीया,मुतखड्याचे विकार,स्त्रीरोग तपासणी,दंत,कान,नाक,घास,त्वचारोग,व लहान मुलांची तपासणी करण्यात आली.तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया , चष्मे,श्रवणयंत्र,औषधे ईत्यादींचे वाटप करण्यात आले.ईसीजी एक्सरे,व ॲजिओग्राफी या विशेष मोफत सुविधा या शिबिरात उपलब्ध करून देण्यात आली.

या शिबिरासाठी आदीत्य हॉस्पीटल ,मेहता हॉस्पीटल,कुल्लोळी हॉस्पीटल, सिनर्जी हॉस्पीटल, सेवासदन हॉस्पीटल,शारदा हॉस्पीटल,साईहार्ट सेंटर,लायन्स हॉस्पीटल, कोकीळाबेन अंबानी हॉस्पीटल, फोर्टीज हॉस्पीटल, सेवन हिल्स हॉस्पीटल,यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे. शिबीरात सहभागी झालेले सर्व हॉस्पिटल, डायग्नोस्टिक सेंटर, अधिकारी, डॉक्टर्स, वैद्यकीय तंत्रज्ञ,आशा वर्कर्स, इ.योगदान देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. 

या शिबिराचा मुख्य उद्देश असा की महापालिकाक्षेत्रामधील जी आर्थिक दृष्ट्या अतिशय दुर्बल आहेत जे आपल्या आर्थिक उत्पन्नातून वा पैशा अभावी आपल्या आजारावर उपचार करू शकत नाहीत. अशा सर्व गरजू जनतेला त्यांचे आरोग्य चांगले रहावे या एकमेव उद्देशाने या शिबिराचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.महापालिकाक्षेत्रामधील महिला भगिनी असतील,वृद्ध पुरुष असतील त्यांना आरोग्याच्या बाबतीत कुठलीच अडचण येऊ नये असा राष्ट्रवादी काँग्रेसचा नेहमीच मानस असतो..

विविध प्रकारचे कॅन्सरचे उपचार केमोथेरपी गर्भाशयाचे व स्तनांचे कॅन्सर हाडांचे सर्व ऑपरेशन अपघात व फ्रॅक्चर मणक्याच्या शस्त्रक्रिया मेंदूंच्या शस्त्रक्रिया लहान मुलांच्या शस्त्रक्रिया इत्यादी रोगांविषयी प्राथमिक उपचार व मार्गदर्शन करण्यात आले.शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष,अप्रत्यक्षपणे परिश्रम घेणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना पण धन्यवाद देतो.

यावेळी प्रमुख उपस्थिती शहर-जिल्हाध्यक्ष संजय बजाज,माजी नगरसेवक हरिदास पाटील,मदन पाटील,नगरसेवक विष्णू माने,शेडजी मोहीते,सागर घोडके,डॉ .पृथ्वीराज पाटील,उमर गवंडी,संदीप दळवी, डॉ .शुभम जाधव,आयुब बारगीर,नर्गीस सय्यद,अक्षय अलकुंटे,संदीप व्हनमाने, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच सेलचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *