कोल्हापूर : कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने कोल्हापूर महानगरपालिका चषक फुटबॉल स्पर्धा सन २०२३ दिनांक ६ ते १९ मार्च २०२३ या कालावधीत छत्रपती शाहू स्टेडियम येथे भरविली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये शहर हद्दीतील १४ नामांकित संघसहभाग असणार आहे.सदर स्पर्ध्येतून कोल्हापूर स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान तसेच इतर शासकीय योजनाचा प्रसार करणेत येणार आहे. स्पर्धेतील उद्घाटनाचा सामना जुना बुधवार तालीम मंडळ विरुद्ध कोल्हापूर पोलीस फुटबॉल संघ यांच्यात चार वाजता होणार आहे.
स्पर्धेतील विजयी संघास रु.१ लाख ५० हजार व चषक, उपविजेत्या संघास ७५ हजार व चषक असे बक्षीसाचे स्वरुप असणार आहे. याशिवाय उत्कृष्ठ गोलकिपर, उत्कृष्ठ डिफेन्स, उत्कृष्ठ हाफ, उत्कृष्ठ फॉरवर्ड खेळाडूस प्रत्येक रुपये १०,०००/- व चषक व संपुर्ण स्पर्धेतील उत्कृष्ठ खेळाडूस रुपये २०,०००/- व चषक असे बक्षीस देण्यात येणार आहे. व स्पर्धेतील पहिल्या फेरीत बाद होणाऱ्या आठ संघास प्रत्येकी रुपये ५,०००/- व दुसऱ्या फेरीत बाद होणाऱ्या संघास प्रत्येकी रुपये १०,०००/- देणेत येणार आहे. उपांत्य सामना पराभूत दोन्ही संघास रु.२० हजार बक्षीस देण्यात येणार आहे.सर्व फुटबॉल स्पर्धा ह्या बाद पध्दतीने खेळविण्यात येणार आहेत. कोल्हापूर स्पोटर्स असोसिएशन व कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशन यांचे नियमानुसारच पार पडतील.
फुटबॉल स्पर्धे ठिकाणी सिक्युरिटीसाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडील कर्मचारी, प्रथमोपचार व्यवस्थेसाठी महापालिका आरोग्य विभागाकडील ऍ़म्ब्युलन्स व फिजोओथेरपीस्ट उपलब्ध असतील. तसेच कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशन मार्फत क्लोज सर्किट कॅमेरा सुविधा पुरविल्या जाणार आहे.