शिर्डी (प्रकाश कांबळे):
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील मिशन रिपब्लिकन पक्ष हा खेड्या – पाड्या पर्यत पोहचला असून त्यामाध्यमातून लोकांना न्याय देण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे . हीचं खरी जयभीमची व्रजमुठ असून डॉ आंबेडकरांशिवाय क्रांतीचं नसून ही कशली महाविकास आघाडीची व्रजमुठ ? रिपब्लिकन पक्ष सत्तेसाठी काम करत नाही तर सामाजिक दायित्व म्हणून काम करत आहे . जिकडे रिपब्लिकन पक्ष तिकडे सत्ता असतेचं तेव्हा प्रकाश आंबेडकरांनी यांचा विचार करावा असे मार्मिक टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी लगावला .
शिर्डी येथे आयोजित केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्यस्तरीय महाअधिवेशनाप्रसंगी ना रामदास आठवले बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे हे होते . तर राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील , श्रीमती सिमाताई आठवले , माजी मंत्री अविनाश महातेकर , राज्याचे उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव , नागालँड आमदार वाय लिमा ओनेन चंग , आमदार इम्तिचोबा चंग , राज्य कार्याध्यक्ष बाबूराव कदम , सरचिटणीस गौतम सोनवणे , जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे , राज्य सचिव दिपकराव गायकवाड , उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , विभाग प्रमुख भिमा बागुल , युवा जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे , जिल्हा महीला आघाडी अध्यक्षा सिमा बोरुडे , कोपरगांव महीला आघाडी तालुकाध्यक्ष वैशालीताई सोनवणे , वंदना म्हसे आदीसह राज्यभरातून कार्यकर्ते उपस्थित होते .
ना . रामदास आठवले पुढे म्हणाले की , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोर गरिबांकरिता अनेक योजना राबविल्या असून त्याची देशातचं नव्हे तर विश्वात लोकप्रियत्ता वाढली . भाजपा बरोबर रिपाईची भक्कम साथ असल्याने यांचा मोठा फायदा २०२४ ला होणार असून ३५० जागा जिंकून नरेंद्र मोदी हॅटट्रिक साधणार असल्याचा विश्वास व्यक्त करत . रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यानी आता शिस्त पाळली पाहिजेल . सामाज्यात कार्यकर्ता म्हणून मिरवणाऱ्यांनी बेशिस्त होवून चालणार नाही आपला पक्ष हा सत्तेच्या प्रवाहात आहे . प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू असून ते आमचे नेते आहे त्यांनी राजकारणाची दिशा ओळखून भाजपाबरोबर यावे त्यांचा फायदा समाज्याला होईलचं ! तर उद्धव ठाकरे हे प्रामाणिक व शांत स्वभावाचे असून त्यांची दिशा चुकली त्यांनी पुन्हा भाजपाकडे यावे .त्याचा फायदाचं होईल तर आज iPI चा सामना , संसद भवन उट्रघाटन व पक्षाचा मेळावा असल्याचा योगायोग असल्याचे शेवटी म्हटले .
यावेळी महसूल मंत्री ना . राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की , रिपब्लिकन पक्ष व विखे पाटील परिवार एकचं असून रामदास आठवले यांचा गोपिनाथ मुंडे प्रमाणेचं मुळात राजकिय पिंड म्हणजे संघर्षमय नेतृत्व राहिले . मैत्रित्व नाते जपणारे नेते असल्याने सर्वस्तरावर त्यांचे मित्रत्वांचे संबंध असून समाज्याकरिता अहोरात्र काम करणारे व्यक्तीमत्व असून रामदास आठवले यांना एडीए मधून बाहेर पडण्यासाठी फार प्रयत्न करण्यात आले मात्र समाज्याप्रती त्यांचे असणारे प्रेमाखातर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदीला भक्कम साथ दिली तर आज संपूर्ण देशात नव्हे तर विश्वात नरेंद्र मोदी मोदीचा सन्मान होत असून शेवटच्या घटकापर्यत असणार्या माणसाला न्याय देण्याचे काम केले त्याचं मोदीच्या मंत्रीमंडळात सलग नऊ वर्ष मंत्री म्हणून आठवले यांनी प्रामाणिक व एक निष्ठेने काम केल्याने समाज्याप्रती एक डाग ही अंगावर ओढवून घेतला नसल्याने कार्यकर्त्यानी समाज्यात निर्माण होणार्या ज्या प्रश्नाचे ठराव केले त्यात आठवले यांच्या सन्मानाचाही एक ठराव करा . या सर्व ठरावाना माझा पाठिंबा आहे असे ना विखे पाटील शेवटी म्हणाले .
यावेळी अविनाश महातेकर , राजा सरवदे , विजयराव वाकचौरे , श्रीकांत भालेराव , बाबुराव कदम , शिलाताई गांगुर्डे , चंद्रकला सोनकांबळे बाळासाहेब गायकवाड यांची भाषणे झाली .