Share Now
Read Time:1 Minute, 1 Second
कोल्हापूर : कोल्हापूरच्या जिल्हा माहिती अधिकारी पदी आज सचिन अडसूळ रुजू झाले.मूळचे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील बिदाल येथील असणाऱ्या सचिन अडसूळ यांनी यापूर्वी गडचिरोली येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केले आहे, तसेच सचिन अडसूळ यांनी शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन विभागात शिक्षण घेतले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी सचिन अडसूळ यांचे स्वागत केले. यावेळी सचिन वाघ, सतीश कोरे, अनिल यमकर, दामू दाते, साक्षी मोरे स्वप्नाली कुंभार आदी उपस्थित होते.
Share Now