पत्रकारांनी बातमीकडे सजगतेने पहावे : डॉ. ज्ञानेश्वर मुळे

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 23 Second

कोल्हापूर : समाजातील विविध प्रश्नांकडे पत्रकारांनी सजगतेने पहावे असे मत राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी व्यक्त केले. युवा पत्रकार संघ कोल्हापूर यांच्या दिल्ली पत्रकार अभ्यास दौऱ्यातील पत्रकारांनी डॉ. मुळे यांची राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे आय.एन.ए. स्थित कार्यालयात भेट घेतली. यावेळी संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजी शिंगे यांनी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचे स्वागत केले. 

डॉ. मुळे पुढे म्हणाले कि, समाजातील शेवटच्या घटकाचे प्रश्न सातत्याने मांडणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिक आणि पत्रकार यांनी एकमेकांना सहाय्य्य करणे गरजेचे आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती यावर त्यांनी आपले मत मांडले. आम्ही चालवलेली “चांगुलपणाची चळवळ” हा उपक्रम सर्व सामान्य पर्यंत पोचवण्याची संदेश त्यांनी दिले.  यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तर दिले. 

युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजी शिंगे यांनी पत्रकारांच्या विविध मागण्यांचे निवेदन डॉ. मुळे यांना दिले. त्यावर डॉ. मुळे यांनी सकारात्मकता दाखवली. श्री शिंगे यांनी पत्रकारिता करीत असताना कोणकोणते आव्हान येते यावर आपले मत व्यक्त केले. 

या वेळी युवा पत्रकार संघाचे पदाधिकारी, अजय शिंगे, अपर्णा पाटील, शरद माळी, नियाज जमादार, अक्षता नाईक, रवि कांबळे, पुष्पा पाटील, उदय पाटील,समीर लतीफ इत्यादी  उपस्थित होते. तर आभार राज्य कार्याध्यक्ष विवेक पोर्लेकर यांनी मानले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *