Share Now
Read Time:1 Minute, 21 Second
मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क
देशाच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आम आदमी पार्टी ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी आयुर्वेदाचार्य डॉ. सुनील पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
छ. शिवाजी पेठ परिसरातील हुतात्मा निवृत्ती अडुरकर, शहीद जवान अभिजित सूर्यवंशी, स्वातंत्र्य सैनिक दत्तोबा तांबट, अण्णासो चव्हाण यांच्याशी कुटुंबियांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
तसेच महापालिका शववाहिका चालक तुषार बांदेकर, धीरज फाले,सुभाष दिवसे,
रोहित सोमवंशी, राजाराम पाटील, देवदास वासुदेव, देवानंद कांबळे, विनोद गवळी, सर्जेराव माने, करण मोरे, अनिल मगदूम,
दिगंबर वासुदेव यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी आप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share Now