जावेद देवडी: सलग तीन दिवस पोलीस मुख्यालय येथे पार पडलेल्या ४७ व्या कोल्हापूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दिमाखात पार पडला. सदर बक्षीस वितरण समारंभ महेंद्र पंडित पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले
तसेच अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील,श्रीमती जयश्री देसाई स. पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील,अजित टिके तसेच कोल्हापूर शहर व विभागातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
सदर स्पर्धेत कोल्हापूर पोलीस दलातील एकूण १४० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. बक्षीस वितरण समारंभाची सुरुवात महिला व पुरुष १०० मीटर धावणे अंतिम स्पर्धे पासून सुरू झाली.
त्यानंतर पोलीस अधीक्षक यांना संचालनाद्वारे मानवंदना देण्यात आली.
सदर स्पर्धेचे नियोजनबद्ध आयोजन राखीव पोलीस निरीक्षक राजकुमार माने यांचे मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार संदीप जाधव, उदय शेळके बाबा धुळे ,तुषार कांबळे ,हरी पाटील ,सुनील जांभळे ,धनंजय परब ,बाबा दुकाने ,विनायक गुरव यांनी केले.