करवीर पोलीसांनी मोटारसायकल चोरट्यास केले जेरबंद..

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 48 Second

कोल्हापूर(प्रतिनिधी) करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांनी गणेश उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सक्त पेट्रोलिंग करण्याचे मुखशील आदेश पोलीस कर्मचाऱ्यांना दिले होते.

त्या आदेशाचे पालन करत असताना करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी संभाजी यल्लाप्पा नदींवाले हा विनानंबर प्लेट मोटारसायकल वरून जात असताना त्याचा संशय आल्याने करवीर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे,पोलिस हे.कॉ. सुभाष सरवडेकर,विजय तळसकर,सुजय दावणे, रणजीत पाटील, अमोल चव्हाण, प्रकाश कांबळे, योगेश शिंदे, अमित जाधव यांना बालिंगा दोनवडे साबळेवाडी खुपीरेकडे जात असताना विनानंबर प्लेट मोटरसायकल संशयावरून थांबवली त्याच्याकडे कागदपत्राची विचारपूस केले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदर मोटरसायकल ही आठ महिन्यापूर्वी खुपीरे येथील राम मंदिराजवळ लावलेले असताना चोरी केल्याचे सांगितले त्याबाबत करवीर पोलीस ठाण्यास गुन्हा नोंद करून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता आणखी सात मोटरसायकली चोरी केल्याची त्यांनी सांगितले,

त्याच्या ताब्यातून एक लाख साठ हजार रुपयांच्या आठ मोटरसायकल जप्त करून सदर आरोपी विरोधात गुन्हा नोंद केला सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, करवीर उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे ,पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष सरवडेकर ,विजय तळसकर सुजय दावणे, रणजीत पाटील ,अमोल चव्हाण ,प्रकाश कांबळे ,योगेश शिंदे अमित जाधव, रोहन वाकरेकर, सुनील देसाई यांनी केली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *