Media control news network
सीडीएम मशिनमध्ये खाते धारक हरिष जसनाईक रा. सेक्टर 35 जी, खारगर मुंबई याचे आय.सी.आय.सी बँक खाते नंबर नं 727701500465 वर एकुन 500/- रु च्या 20 बनावट नोटा असे एकुन 10,000/- रु भरलेबाबत अज्ञात व्यक्ती विरुद्ध तृप्ती विजयकुमार कांबुज (बँक मॅनेजर) यांनी दिले फिर्यादी वरून गुन्हा दाखल असून दाखल गुन्हयांचा तपास करत असता सात आरोपींना अटक करण्यात आले.
1] रोहन तुळशीराम सुर्यवंशी वय वर्षे 24 महाराष्ट्र बँकेच्या मागे गडमुडशिंगी कोल्हापूर,
2) कुदंन प्रविण पुजारी वय वर्ष 23 रा. धरती माता हौसींग सोसायटी, विचारेमाळ, कोल्हापूर,
3] ऋषिकेश गणेश पास्ते वय वर्ष 23, रा.412 डी वॉर्ड, गंगावेश, कोल्हापूर. यातील तीन वरील आरोपींना या अगोदरच अटक केली आहे.
4) अजिंक्य युवराज चव्हाण वय वर्ष २६, रा. रमनमळा, कसबावडा चकमक,चौक कोल्हापूर.
5] केतन जयवंत थोरात-पाटील वय वर्ष 30, रा. मराठी शाळेजवळ, गांधीनगर, पिपंरी पुणे.
6) रोहीत तुषार मुळे वय वर्ष 33, रा. घर नंबर 22, संगमनगर कॉलनी, मलकापुर, ता. कराड, जि. सातारा.
7) आकाश राजेद्र पाटील वय वर्ष 20, रा. महिंद्र इंथीया सोसायटी, गांधीनगर, पिपंरी पुणे.
यांची दिनांक 11/04/2024 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे. व दि. 28/03/2024 रोजी आया सी आय सी आय बँक वसंत प्लाझा ग्रांउड प्लोवर राजाराम कोल्हापुर येथे दिनांक 30/03/2024 रोजी गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हयांचा – हेतु पाचशे रुपयांच्या बनावट नोटा खपवणे. :- 10,000/-रु त्यामध्ये 500 रुपये दराच्या बनावट नोटा एकुण 20 सदर गुन्हयांचे तपासामध्ये यातील आरोपी 1 नंबर यांने यातील आरोपी नंबर 2 व 3 यांचेकडून प्रत्येकी 5,000/-रुपये असे एकुण 10,000/-रुपये घेऊन ते खरे पैसे यातील आरोपीत नंबर 5 यास देऊन त्या बदल्यात 500 रुपये दराच्या खोटया नोटा एकुण 25,000/-रुपये घेऊन त्या खोट्या नोटा आरोपीस नंबर 2 व 3 यांना प्रत्येकी 12,000/-रुपये असे एकुण 24,000/-रुपये देऊन त्यातील 1,000/-रुपये आपण स्वता खपवले तसेच यातील आरोपी नंबर 4 याने यातील आरोपी नंबर 1 यास बनावट नोटा बाजारात खपविण्या करीता व त्या आरोपी नंबर 5 याचे कडून घेण्याकरीता आरोपी नंबर 1 याची आरोपी नंबर 5 याचेशी ओळख करून दिली. तसेच आरोपी नंबर 3 याने त्या बनावट नोटा बाजारात खपविण्याकरीता यातील साथीदार यास कोणत्याही प्रकारची कल्पना न देता त्यास एकुण 10,000/-रुपये बनावट नोटा व ख-या नोटा एकुण 33,000/-रुपये असे एकुण 43,000/-रुपये त्यास दिलेने यातील साथीदार याने सदरच्या नोटा बँकेच्या सीएमएस मशीनमध्ये भरल्या असलेने त्यापैकी 10,000/-रुपयेच्या बनावट नोटा बाजारात खपविलेल्या आहेत. यातील आरोपी नंबर 5 याचे सांगणेवरुन आरोपी नंबर 6 याने बनावट नोटाची छपाई केली व त्या नोटा आरोपी नंबर 5 यास देऊन त्या बाजारात भारतीय चलनात आणून शासनाची फसवुक केली आहे. सदर गुन्हयांचा तपास शाहूपुरी ठाणेचे
पोलीस निरीक्षक अजय सिंदकर हे करत आहेत.