LOKSABHE 2024 EXIT POLL : सत्ता कोणाची ? इंडिया की एनडीए..?

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 44 Second

अनेक  दिवसांपासून सुरु असलेला लोकसभेचा खेळं येत्या ४ जूनला संपणार आहे आणि त्या खेळात कोण बाजी मारणार आणि कोणाची होणार हार हे ४ जून रोजी संपूर्ण देशाला समजेल.यंदाच्या निवडणुकीत NDA विरुद्ध INDIA आघाडी असा थेट सामना पाहायला मिळाला. काल देशातील स्तरावरून आलेल्या एक्सिट पोल नुसार महाराष्ट्रात  महाविकास आघाडी आघाडीवर आहे. असे चित्र दिसत आहे पण देशात पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन करणार असे दिसत आहे पण एक्सिट पोल खरे ठरणार कि कोसळणार हे चार जून रोजी स्पष्ट होईल. एक्झिट पोलनुसार  ठाकरेंना अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे.  19 ठिकाणी ठाकरे गटाला यश मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा गड मुख्यमंत्र्यांना राखता येणार नाही हे स्पष्ट आहे .

बहुतेक सर्वेक्षण संस्थांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीला 50-50 टक्के जागा येण्याचा अंदाज वर्तवलाय.

महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांबाबत अनेक धक्कादायक निकाल एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आले आहेत. एबीपी सी-व्होटर या संस्थेने जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील अंदाजानुसार, महाराष्ट्रात महायुतीला 22 ते 26 जागा मिळतील, तर महाविकास आघाडीच्या पारड्यात 23 ते 24 जागा मिळतील.

टीव्ही नाईन-पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महायुतीला 22 जागा, तर महाविकास आघाडीला एकूण 25 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 28 ते 32 जागा, महाविकास आघाडीला 16 ते 20 जागा आणि इतरांना 0 ते 2 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

चाणक्य या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, एक्झिट पोलमध्ये महायुतीला 28 ते 38 जागा मिळतील. महाविकास आघाडीला 10 ते 20 जागा आणि अपक्ष उमेदवाराला एकही जागा मिळणार नाही असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
न्यूज-18च्या एक्झिट पोल नुसार महायुतीला 32 ते 35 जागा आणि मविआला 15 ते 18 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

देशात पुन्हा मोदी ???

राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज या संस्थांनी वर्तवला असला तरी भाजप त्यांचा ‘400 पार’ची घोषणा मात्र एक्झिट पोलमध्ये पूर्ण करताना दिसत नाही.

राष्ट्रीय पातळीवरचे एक्झिट पोल…..

‘इंडिया न्यूज – डी डायनामिक्स’ या संस्थेच्या आकडेवारीनुसार एनडीएला 371 जागा, इंडिया आघाडीला 125 जागा आणि 47 जागा इतरांना मिळतील

दैनिक भास्कर या संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएला 281 ते 350 जागा मिळतील.

इंडिया आघाडीला 145 ते 201 जागा तर 33 ते 49 जागा इतर उमेदवारांना मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

एनडीटीव्हीरिपब्लिक भारत मॅट्रीझच्या आकडेवारीनुसार, एनडीएला 353 ते 368, इंडिया आघाडीला 118 ते 133 आणि 43 ते 48 जागा या इतरांना मिळतील नुसार, एनडीएला 362 ते 392 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे, इंडिया आघाडीला 141 ते 161 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 10 ते 20 जागा इतरांना मिळतील

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *