Share Now
जालना : मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण करणाऱ्या मनोज जरांगेंची प्रकृती खालावली आहे. त्यांनी डॉक्टरांचे उपचार घेण्यास नकार दिला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. ८ जून पासून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी हि त्यांची प्रमुख मागणी आहे.
भोळे मराठे मतं देतात, त्यांचा फायदा घेतला जातो. निवडून आले की मस्तीत यायचं हे कसं चालेल? तुम्ही आत्ता निवडून आला असाल तर विधानसभेला सगळ्यांना पाडणार. निवडून आल्यावर मराठ्यांना आरक्षण दिल्याची भाषा करणार असाल तर विधानसभेला बघून घेऊ. सरकारने अधिसूचना काढली आहे. अंमलबजावणी झाली नाही तर त्यांना कोट्यवधी मराठ्यांची नाराजी परवडणार नाही. मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका, असंही जरांगे म्हणाले आहेत. मराठ्यांचा रोष अंगावर घेतला तर विधानसभेला सगळं गणित अवघड होईल असंही मनोज जरांगेंनी मंगळवारी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.
Share Now