भाजपा कोल्हापूर लोकसभा आढावा बैठक संपन्न…

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 20 Second

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज भाजपा कार्यालयामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदार संघाची विधानसभा निहाय आढावा बैठक चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बूथ स्तरावर पडलेल्या मतांच्याबाबत याबैठकीत सविस्तर विश्लेषण करण्यात आले.ज्या बुथवर आपण मताधिक्य घेऊ शकलो यामध्ये अधिक मताधिक्यांची भर कशी पडेल व ज्या ठिकाणी कमी मतदान झाले या ठिकाणी आपल्याला कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याबाबतची चर्चा करण्यात आली. चंदगड, कागल, करवीर, राधानगरी, उत्तर, दक्षिण या सहा विधानसभा मतदारसंघांची सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत या बैठका संपन्न झाल्या. यावेळी तालुका अध्यक्ष, विधानसभा निवडणूक प्रमुख, विधानसभा विस्तारक यांची उपस्थिती होती.

सुरवातीला चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या बळावर तीस-यांदा नरेद्र मोदी यांना पंतप्रधान पदी विराजमान केल्याबद्दल, देशाला प्रगतीपथावर नेणारे सरकार केंद्रात आणल्याबद्दल सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, जनतेचे अभिनंदन केले. त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने प्रत्येक भाजपा नेते, प्रमुख पदाधिका-यांनी आपापल्या बूथ मध्ये केंद्र व राज्य सरकारच्या योजना, वैद्यकीय सहाय्य तसेच समाज उपयोगी उपक्रम जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन चंद्रकांतदादा पाटील यांनी याप्रसंगी केले.

याप्रसंगी मकरंद देशपांडे, धनंजय महाडिक, विक्रम पावसकर, महेश जाधव, समरजीतसिंह घाटगे, विजय जाधव, राहुल चिकोडे, राहुल देसाई, नाना कदम, अमल महाडिक, शौमिका महाडिक, भरमू आण्णा पाटील, संग्राम कुपेकर, नाथाजी पाटील, अशोक चराटी, अशोक देसाई, नामदेव पाटील, शांताराम पाटील, अनिल शिवनगेकर, हंबीरराव पाटील, दत्तात्रय मेडशिंगे, अनिल पडवळ, नामदेव पाटील, अप्पा लाड, महेश चौगले, अनिल पंढरी, एम.पी.पाटील, संजय पाटील, राजेंद्र तारळे, प्रीतम कापसे, देवराज बारदेस्कर, अल्केश कांदळकर, संभाजी आरडे, अनिरुद्ध केसरकर, गायत्री राउत, डॉ राजवर्धन, विराज चिखलीकर, विशाल शिराळकर, प्रदीप उलपे, अजित ठाणेकर, चंद्रकांत घाटगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *