तृतीयपंथीयांसाठी 21 जून रोजी विशेष कार्यशाळा..

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 44 Second

सांगली :  तृतीयपंथीयांना ओळखपत्रे व प्रमाणपत्रे वितरीत करणे, त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांची प्राथमिक माहिती संकलित करणे, तृतीय पंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याणबाबत काही अडचणी, समस्या असल्यास त्या जाणून घेणे, या व्यक्तींच्या शासनाप्रती असणाऱ्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी दि. 21 जून 2024 रोजी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही कार्यशाळा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सांगली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, जुना बुधगांव रोड, सांगली येथे होणार असून या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीय व्यक्तींनी उपस्थित रहावे, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी National Portal for Transgender Persons हे पोर्टल दि. 25 नोव्हेंबर 2020 पासून सुरू करण्यात आले आहे. transgender.dosje.gov.in या लिंकद्वारे तृतीयपंथी व्यक्ती ते कुठेही असतील तेथून अर्ज करू शकतात. या पोर्टलवरून अधिकाधिक तृतीयपंथीयांना ओळखपत्रे व प्रमाणपत्रे देण्यासाठी त्यांच्या माहितीचे संकलन करणे आवश्यक आहे. याकामी जिल्हास्तरीय तृतीयपंथीय तक्रार निवारण समितीच्या मान्यतेने सर्व्हेक्षण अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे.

या कार्यशाळेसाठी तृतीयंपथीय व्यक्ती यांनी त्यांचे आधारकार्ड, मतदानकार्ड, पॅनकार्ड, जन्माचा दाखला, रेशनकार्ड, पासपोर्ट, पासबुक, जातीचा दाखला, मनरेगाकार्ड , शैक्षणिक पात्रताबाबत कागदपत्रे, दिव्यांग असलेस प्रमाणपत्र इ. नमूद दस्तऐवजांची छायांकित प्रत / झेरॉक्स प्रत सोबत घेवून येणे आवश्यक असेल, असे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *