थायोमेथोक्झामच्या बिज प्रक्रियेद्वारे करा सोयाबीनवरील खोडमाशीचे व्यवस्थापन…

0 0

Share Now

Read Time:5 Minute, 20 Second

सांगली : किटकशास्त्र विभागाने बिज प्रक्रिया करूनच सोयाबीन पीक पेरावे या संदर्भात संदेश प्रसारीत केला होता. ज्या शेतकऱ्यांनी बिज प्रक्रिया केली तेथे खोडमाशीवा प्रादुर्भाव अल्प प्रमाणात दिसून आला. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासूनच या किडीच्या व्यवस्थापणासाठी बिज प्रक्रिया करूनच लागवड करावी, असे डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी. बी. उंदिरवाडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

या किडींचा प्रादुर्भाव पिकाचे रोपावस्थेपासूनच म्हणजे रोप 10 ते 15 दिवसाचे झाल्यानंतर होतो त्यामुळे त्याचा ताटाचे संख्येवर विपरीत परिणाम होऊन पीकाची दुबार पेरणीची शक्यता असते मात्र बिजप्रक्रिया केल्यास सोयाबीनचे पीक जवळपास 25 ते 30 दिवस पर्यंत या किडीस कमी प्रमाणात बळी पडते.
किडीचा जीवनक्रम व नुकसानीचा प्रकार – खोड माशी लहान, चमकदार काळ्या रंगाची असून त्यांची लांबी 2 मि.मी. असते. अंड्यातून निघालेली अळी पाय नसलेली, फिक्कट पिवळ्या रंगाची २-४ मि.मी. लांब असते. ही अळी प्रथम जवळच्या पानाच्या शिरेला छिद्र करते. अळी नंतर पानाच्या देठातून झाडाचे मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करुन आतील भाग पोखरुन खाते. प्रादूर्भावग्रस्त खोड चिरून पाहिल्यास पांढूरक्या रंगाची अळी किंवा कोषला लसर नागमोडी भागात दिसते. खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत झाल्यास किडग्रस्त झाड वाळते व मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मोठ्या रोपावर असा परिणाम दिसत नाही, परंतु अशा रोपावर खोडमाशीच्या अळीचे प्रौढमाशीला बाहेर येण्यासाठी केलेले छिद्र आढळते. खोडमाशीची अळी तसेच कोष फांद्यात, खोडात असतो. अशा किडग्रस्त रोपावरील फुलांची गळ होते व शेंगातील दाण्याचे वजन कमी होऊन उत्पादनात 16-30 टक्के घट होते.

सोयाबीन पिकाची पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास रासायनिक किटकनाशक थायोमेथोक्झाम 30 टक्के एफ एस (उदा. पोलोगोल्ड, स्लेअर प्रो) 10 मि.ली. / 1 कि. बियाणे बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी त्यामुळे सुरुवातीच्या 25 ते 30 दिवस सोयबीन पीक खोड माशी या किडीच्या प्रादुर्भावापासून मुक्त राहते. बिज प्रक्रिया करताना सर्वप्रथम रासायनिक बुरशीनाशकाची बिज प्रक्रिया करावी त्यानंतर रासायनिक किटकनाशकाची व सर्वात शेवटी जैविक बुरशीनाशक व जैविक संर्वधकाची बिज प्रकिया करावी. सोयाबीन पिकामधे उगवणीनंतर आठ ते दहा दिवसानंतर पिवळे चिकट सापळे लावून नियमीत खोडमाशीच्या प्रादुर्भावर लक्ष ठेवावे (25/हे.). ज्या ठिकणी काही कारणा अभावी सोयाबीन बियाण्यास थायोमेथोक्झामची बिजप्रक्रिया केली नसल्यास सोयाबीनचे पीक 15 दिवसाचे झाल्यानंतर इथियॉन 50 टक्के (उदा. गोल्डमिट 50, इथिकल, टॅफेथिऑन) 30 मि.ली. किंवा इंडोक्झाकार्ब 15.8 टक्के (उदा. इंडोगोल्ड प्लस, फेगो) 6.7 मि.ली. किंवा क्लोरॅट्रेनिप्रोल 18.5 टक्के (उदा. कोराजन, कव्हर लिक) 3.0 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

या किडीच्या वाढीसाठी उष्ण तापमान जास्त आर्द्रता, भारी पाऊस व त्यानंतर कोरडे वातावरण पोषक आहे. असे वातावरण आढळल्यास शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबिन पिकाचे नियमित सर्वेक्षण करून सतर्क राहून नियंत्रणाचे उपाय योजावेत, असे डॉ. डी. बी. उंदिरवाडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *