Share Now
Read Time:1 Minute, 7 Second
इचलकरंजी : इचलकरंजी येथील संग्राम चौक येथे मयत सौ करिष्मा किसन गोसावी व तिचा पती भाड्याने राहत होते त्या दोघांच्यात वारंवार वाद सुरू असायचा, याच वादातून मंगळवारी दिनांक 18 जून रोजी आरोपी किसन गोसावी याने पत्नी करिष्मा हिचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली.
किसन गोसावी हा खून केल्यानंतर फरार झाला होता, शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता आरोपी हा भिवंडी येथे पळून गेल्याचे गोपनीय माहितीद्वारे शिवाजीनगर गुन्हे शोध पथकास समजले. त्या माहितीनुसार पोलीस पथकाने आरोपी किसन पांडुरंग गोसावी (वय 29) यास भिवंडीमधून अटक करून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
Share Now