Share Now
कोल्हापूर : शिवसेना नेहमीच हद्दवाढ, सर्किट बेंचच्या समर्थनार्थ उभी राहिली आहे. सर्वसामान्यांना न्याय देणारे महायुतीचे सरकार असून, सामंजस्याची भूमिका घेवून चर्चेअंती सुटणाऱ्या प्रश्नासाठी कोल्हापूर बंद सारखे स्वरूप देवून शहरवासियांना वेठीस धरणे अयोग्य आहे. हद्दवाढचा प्रस्ताव खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच मागविला आहे. तर सर्किट बेंचसाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. दरम्यानच्या काळात कोल्हापूरचे पालकमंत्री बदल आणि निवडणूक आचारसंहिता यामुळे या प्रक्रियांवर मर्यादा आल्या पण हद्दवाढ आणि सर्किट बेंच हे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच सोडवतील, असा विश्वास शिवसेनेच्या जिल्हा व शहर कार्याकारीच्या बैठकीस व्यक्त करत उद्या होणारा बंद मागे घ्यावा आणि चर्चेद्वारे प्रश्न सोडवावा असे आवाहन कृती समिती आणि वाहनधारक समितीस करण्यात आले
Share Now