अफगाणिस्तानने बांगलादेशचा 8 धावांनी पराभव केला आणि ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपमधून आऊट….

0 0

Share Now

Read Time:1 Minute, 52 Second

वेस्टइंडिजमध्ये सुरू असलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने बांगलादेशचा 8 धावांनी पराभव केला आणि एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात जगज्जेता ठरलेला ऑस्ट्रेलियाचा संघ टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे सुपर-8 फेरीतील शेवटच्या सामन्यांपर्यंत उपांत्य फेरीत कोण पोहोचणार याची उत्सुकता होती आणि अत्यंत चुरशीच्या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव केला.
विजयानंतर प्रतिक्रिया देताना अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान म्हणाला की, “मी आज खूप आनंदी आहे. आमच्यासाठी हा विजय स्वप्नवत आहे.
वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ब्रायन लाराने आमच्यावर खूप आधी विश्वास दाखवला होता आणि आम्ही वेस्ट इंडिजमध्ये आलो तेंव्हा त्याने आमच्यासाठी वेलकम पार्टी दिली होती त्या पार्टीत त्याने आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्ही ढळू दिला नाही. माझ्या देशवासियांसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.
टी-20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत आता 27 जूनला भारतीय वेळेनुसार पहाटे साडेपाच वाजता अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा सामना होईल आणि त्याचदिवशी संध्याकाळी भारत विरुद्ध इंग्लंड अंतिम फेरीत जाण्यासाठी एकमेकांशी लढत असतील

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *