इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या स्वतंत्र कार्यालयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 10 Second

कोल्हापूर, दि. 26 : सामाजिक न्याय दिनी कोल्हापूर मध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे स्वतंत्र कार्यालय सुरु होत आहे, हा छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर नगरीचा अभिमान आहे असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी जिल्हाधिकारी, अमोल येडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंडले, सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण सुनिता नेर्लीकर, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे, इतर मागास बहूजन कल्याण विभागाचे निरिक्षक दत्तात्रय पाटील, सतीश सुतार, बाबासाहेब वडगावकर तसेच विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. हे कार्यालय शासकीय निवासस्थान परिसर, विचारे माळ, कोल्हापूर या ठिकाणी सुरू झाले आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त वृक्षारोपण कार्यक्रमास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते सुरूवात

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती निमित्त संपूर्ण जिल्हयात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केले जणार आहेत. याचे उद्घाटन व सुरूवात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते कंदलगाव येथे वृक्ष लावून झाली. जिल्हाधिकारी कार्यालय आणि ग्रामपंचायत कंदलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कंदलगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगणावर वृक्षारोपणाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी अमोल येडगे तसेच अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांचेहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी हरीष धार्मिक, तहसिलदार स्वप्निल रावडे, गट विकास अधिकारी विजय यादव, सरपंच राहूल पाटील यांचेसह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत सरपंच राहूल पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला शालेय विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *