Share Now
Read Time:1 Minute, 6 Second
Kolhapur News : कोल्हापूरातील कनान नगर येथे राहणाऱ्या पंकज निवास भोसले या तरुणाचा चार हल्लेखोरांनी काठी आणि दगडाने ठेचून खून निघृण खून केला. राजारामपुरी 13 गल्ली येथील दीपा गॅस एजन्सी नजीक घडलेल्या या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले असून दोन जण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे .
शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके, राजारामपुरी पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे हे घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. कनान नगर परिसरात राहणाऱ्या तरुणांनीच हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Share Now