अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर कारवाई; 25 हजारांचा मुद्देमाल जप्त

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 29 Second

कोल्हापूर  : भारतनगर झोपडपट्टी (साळोखे पार्कजवळ) या भागात अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या पथकाने 2 जुलै रोजी छापा टाकून अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर कारवाई केली. यावेळी घटनास्थळावर वजनकाटा, 1HP क्षमतेची मोटर, पाईप नोझल, 3 रिकामे 2 भरलेले 14KG घरगुती वापराचे LPG सिलेंडर असा एकूण अंदाजे 25 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

अवैध गैस रिफिलींग स्टेशन हे महंमद अल्लाबक्ष मकानदार ही व्यक्ती चालवत होती. त्याच्यावर आयपीसी कलम 285 कलम 286 तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम तीन व पाच अन्वये राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पथकामध्ये पथक प्रमुख अन्नधान्य वितरण अधिकारी नितीन धापसे -पाटील यांच्यासह पुरवठा निरीक्षक मुकुंद लिंगम, भाऊसाहेब खोत व अक्षय ठोंबरे यांचा समावेश होता.

या कारवाईबद्दल जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले तसेच यापुढेही अशीच कारवाई करत राहण्याच्या सूचना दिल्या. ही वस्ती दाटीवाटीची असल्याने अवैध गॅस रिफिलिंग करताना काही दुर्घटना घडल्यास मोठ्या प्रमाणावर जीवित वित्तहानी होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडू शकतो, त्यामुळे शहरातील अशा अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनची माहिती नागरिकांनी जवळच्या पोलीस स्टेशन किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यालयात कळवावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *