Share Now
Read Time:1 Minute, 10 Second
कोल्हापूर, दि. 4 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लाईन बाजार रोड, कसबा बावडा, कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉल परिसरातील पडसर जमीनीतील गवताची सन 2024 करीता विक्री करण्यात येणार आहे. इच्छुक खरेदीदारांनी प्रत्यक्ष पहाणी करुन आपली दरपत्रके सिलबंद लिफाफ्यासह दिनांक 18 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे.
प्राप्त सिलबंद लिफाफ्यातील जास्तीत जास्त रक्कम असणा-या दरपत्रकास मान्यता देण्यात येईल. याबाबतच्या अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 0231-2666185 वर संपर्क साधावा.
Share Now