कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक मदन भंडारी,हेमंत शहा आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

0 0

Share Now

Read Time:7 Minute, 41 Second

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील प्रसिद्ध उद्योगपती विख्यात गिर्यारोहक आणि सुप्रसिद्ध मुसाफिर हेमंत भाई शहा, बांधकाम व्यावसायिक मदन भंडारी व प्रताप उर्फ बापू कोंडेकर आणि गुजरात मधील रीशी पावर सिस्टीम या कंपनीतील उच्च पदस्थ अधिकारी श्री सुधीर बोरा या चार मित्रांनी १५ एप्रिल २०२४ ते २२ जून २०२४ असा ७० दिवसांचा कोल्हापूर ते लंडन या रोड ट्रीपचा आगळा आणि पहिला बहुमान मिळवला.


प्रत्यक्षात ही कल्पना सुचने ती प्रत्यक्ष अंमलात आणणे ही बाब फारच कठीण आणि अवघड आहे.मात्र हे करण्याचे धाडस कोल्हापूरमधील या
प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप उर्फ बापू कोंडेकर यांनी केले आहे.१५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता शिवाजी विद्यापीठ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून या अनोख्या प्रवासास सुरुवात करण्यात आली होती.

“पर्यावरणाचे रक्षण करा ,पाणी वाचवा निसर्ग वाचवा” असा संदेश देण्यासाठी त्यांनी मायनस ९ डिग्री आणि प्लस ४३ डिग्री तापमानाचा सामना करत हा कठीण आणि अवघड असा कोल्हापूर ते लंडन जवळजवळ २० देशांचा ७० दिवसांचा व २० हजार किलोमीटरचा थरारक,अनोखा असा प्रवास चक्क सेव्ह वॉटर सेव्ह नेचर…. या ‘कोल्हापूर ते लंडन’ जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव लंडनच्या हृदयावर कोरले…

आपल्या स्वतःच्या वाहनाने हा प्रवास करून कोल्हापूरच्या शिरपेचात एक मानाचा तुरा या मुसाफिरांनी रोवला आहे.शिवाय वीस देशांना भेटी देत लंडनच्या भूमीवर भारत देशाचा तिरंगा फडकवला आणि कोल्हापूरचे नाव लंडनच्या हृदयावर कोरण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे.
हा संपूर्ण प्रवास या सर्वांनी आपल्या मानसिक आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्या कुटुंबापासून लांब राहून पूर्ण केला आहे.

आपल्या तब्बल १९००० किलोमीटरच्या या प्रवासा दरम्यान या मुसाफिरांनी नेपाळ उजबेकीस्थान, क्रिकीस्थान तुर्कस्तान,रशिया, जॉर्जिया, बल्गेरिया,
सर्बिया,हंगेरी,झेक रिपब्लिक
,बेल्जियम,युनायटेड किंगडम,ग्रीस अशा स्वप्नवत आणि अशक्य वाटणाऱ्या या प्रवासादरम्यान या चार मित्रांनी “सेव्ह वॉटर…! सेव्ह नेचर…!!” हा पर्यावरण रक्षणाचा जनजागृतीचा संदेश प्रत्येक देशापर्यंत पोहोचविला. अनेक तंत्र प्रणालीच्या माध्यमातून खर्चाचे पाणी सुद्धा पिण्या योग्य बनवता येते हा जलमंत्रदेखील या मंडळींनी प्रत्येक देशाच्या मातीत रुजवला. भारतीय संस्कृती आणि नीती मूल्ये अन्य देशात रुजविणे आणि अन्य देशातील चांगल्या गोष्टी, परराष्ट्राच्या विधायक संस्कृतीं आपल्या भारत देशात रुजविणे या देवाण-घेवाणीच्या उदात्त उद्देशाने कोल्हापूर लंडन रोड ट्रीपचे आयोजन केले होते.

अलीकडे ग्लोबल वॉर्मिगचा परिणाम होत चालला आहे.पाण्याची कमतरता,शेती करण्याची पद्धत अवगत करणे आवश्यक आहे,त्याचा मानवावर होणारा परिणाम यासाठी सर्वांनी मिळून काम करणे आवश्यक आहे. या सर्वाचा अभ्यास आणि विविध देशाची संस्कृती याची देवाण घेवाण करण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करा,पाणी वाचवा निसर्ग वाचवा असा संदेश देण्यासाठी आम्ही भारत,नेपाळ,चीन,किर्गिझस्तान,उझबेकीस्तान,कझाकीस्तान,रशियाजॉर्जिया,तुर्की,बल्गेरिया,सर्बिया,हंगेरी,झेकिया,बेल्जियम,युनायटेड किंगडम,ग्रीस आदी २० देशांचा दौरा केला असल्याची प्रतिक्रिया हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

या ७० दिवसांच्या प्रवासात आम्हाला त्या त्या ठिकाणचे गाईड यांनी दिशा दिली. यानुसार आम्ही सर्व देश पाहिले.या सर्वाची तयारी जाण्याआधी सहा महिने केली गेली.सर्व देशांचा अभ्यास माहिती संकलित करूनच आम्ही पुढे जाण्याचा निश्चय केला आणि हा दौरा यशस्वी केला यात आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्प केला.शिवाय प्रत्येक देशाचे नियम, त्याठीकाणची,संस्कृती,राहणीमान,लोकांचे जीवन जगण्याची पद्धती,त्याठिकाणी असणारे रस्ते,निसर्ग,प्रत्येक ठिकाणची खाद्य संस्कृती या सर्वच बाबींचा जवळून अभ्यास केला.या प्रत्येक ठिकाणी आम्ही भारतीय आहोत म्हणून स्वागत करण्यात आले.यातून खूप काही शिकता आले.या विकसित देशांचा विचार करता भारत हा वैभव संपन्न आणि निसर्ग संपन्न देश आहे याठिकाणी लोक स्वतंत्र विचाराने चालतात.मात्र त्याठिकाणी शासनाने घालून दिलेल्या नियमानेच लोकांना रहावे लागते हा फरक जाणवला असल्याचे या सर्वांनी बोलून दाखविले.

अत्यंत खडतर असा ७० दिवसांचा यशस्वी प्रवास करून कोल्हापूरचे हे सुपुत्र २२ जून २०२४ रोजी मायभूमीत परतले.
पाणी, निसर्ग आणि पर्यावरणाच्या रक्षणाच्या त्रिवेणी संदेशाच्या या वारसदारांच्या या कार्याचा गौरव विविध ठिकाणी होत असून कोल्हापूर शहरातील युवा पिढीला या अभियाना मधून निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.पत्रकार परिषदेला राजीव लिंग्रज, डॉ.संदीप पाटील यांची उपस्थिती होती.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *