लाडक्या भावांसाठीही आली योजना : दरमहा मिळणार एवढी रक्कम….

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 16 Second

PANDHAPUR (AJAY SHINGE ) ;  राज्य सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना थेट खात्यावर दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. सध्या या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून लाडक्या भावांसाठी काय अशी विचारणा राज्यातील तरूणांसह विरोधकांनी केली होती. तसेच अधिवेशनात यावरून जोरदार हल्लाबोल विरोधकांनी सरकारवर केला होता. त्यानंतर आता युवा अप्रेंटिसशीप योजनेलाच ‘लाडका भाऊ’ असे नाव देऊन आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरमध्ये ही घोषणा केली आहे.

युवा अप्रेंटिसशीप योजनेंतर्गत राज्यातील तीन वेगवेगळ्या शिक्षण गटांतील विद्यार्थ्यांचा विचार करण्यात आला आहे. अद्याप या योजनेचा कोणताही शासन निर्णय काढण्यात आला नसून मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेच्या धर्तीवर याची घोषणा केली आहे.

या योजनेंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांस दरमहा ६ हजार रुपये, डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थ्यांला ८ हजार रुपये आणि पदवीधरास १२ हजार रुपये महिन्याला दिले जाणार आहेत. तर या योजनेंतर्गत तरूणाला एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप वर्षभर करण्याची संधी मिळार असून तेथेच अनुभवानंतर नोकरी दिली जाईल असेल शिंदे यांनी म्हटले आहे.

लाडका भाऊ योजना साठी पात्रता काय ​?

  • लाडका भाऊ योजना महाराष्ट्र २०२४ चा लाभ घेण्यासाठी, राज्य सरकारने विहित केलेली पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मूळचा महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक आहे.
  • या योजनेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील तरुण किंवा विद्यार्थी पात्र असतील. अर्जदाराचे वय १८ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे.
  • शैक्षणिक पात्रता किमान 12वी पास, डिप्लोमा, पदवीधर इतकी असावी.
  • या योजनेसाठी राज्यातील बेरोजगार तरुणच पात्र असतील.
  • अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे

कसा कराल अर्ज?

  • महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • नवीन वापरकर्ता (New User Registration) नोंदणी पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला एक अर्ज दिसेल.
  • त्या अर्जात तुमचे नाव, पत्ता आणि वयोगट भरा.
  • तसेच त्या अर्जात तुम्हाला विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
  • यानंतर त्यात नमूद केलेली आवश्यक कागदपत्र अपलोड करा.
  • यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा.
  • सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतरच लाडका भाऊ योजना महाराष्ट्र २०२४ अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

आवश्यक कागदपत्रे

  •  आधार कार्ड
  •  पासपोर्ट साईज फोटो
  •  पॅन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  •  पत्त्याचा पुरावा (लाईट बिल,पॅन कार्ड,आधार कार्ड)
  •  कौटुंबिक आयडी पुरावा
  • जात प्रमाणपत्र (कुटुंबातील सदस्य 5 असल्यास)
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *