Share Now
सांगली /कौतुक नागवेकर – कोल्हापुर जिल्हयात विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या वादाच्या पार्श्वभमीवर सांगली जिल्ह्यात शांतता रहावी यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत रुट मार्च काढण्यात आला. सदर संचलनाकरीता पोलीस ठण्यातील अधिकारी, अंमलदार, दंगल नियत्रंण पथक, जलद कृती दलाची पथके व राज्य राखीव पोलीस दलाची पथके सहभागी झाली होती.
तसेच महत्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. तसेच पोलीस ठाणे पोलीस पाटील व शांतता कमिटी सदस्यांच्या मिटींग घेण्यात आल्या आहेत. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन केले आहे की, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता व सलोखा राखावा. सोशल मिडीयावरुन आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर सायबर पोलीस ठाणेकडून लक्ष ठेवले जात आहे. आक्षेपार्ह संदेश/स्टेटस ठेवणाऱ्या लोकांविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
Share Now