यशश्री शिंदे हत्येप्रकरणी दाऊद शेख याला कर्नाटकात अटक

0 0

Share Now

Read Time:1 Minute, 40 Second

उरण : उरणमधील यशश्री शिंदे हिची अत्यंत निघृणपणे हत्या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख याला कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातून नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. नवी मुंबई पोलिसांनी साध्या वेशात आरोपी दाऊदला अटक केली. गेल्या पाच दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. दाऊद शेख याला फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान दाऊद शेख याच्या मुसक्या आवळण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आलं आहे. 29 जुलैला रात्री उशीरा त्याला अटक करण्यात आल्याची माहिती आहे.यशश्री शिंदे हिची हत्या करण्यापूर्वी आरोपीने तिच्यावर अत्याचार केले. दगडाने तिचा चेहरा ठेचण्यात आला होता. तिची ओळख पटवणंही कठीण झालं होतं. याशिवाय आरोपीने तिच्या गुप्तांगावरही वार केले होते. छातीवर वार करण्यात आले होते. काही वृत्तसंस्थांनुसार, तिचे स्तनही कापण्यात आले होते. इतक्या निर्दयीपणे तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणात आरोपी दाऊद शेख याचा तपास सुरू होता. यशश्रीच्या आई-वडिलांनी दाऊद शेख याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *