दूध उत्पादकांना सर्वाधिक सेवा सुविधा देणारा गोकुळ राज्यातील अग्रगण्य दूध संघ – आमदार सतेज पाटील

0 0

Share Now

Read Time:8 Minute, 35 Second

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) संघाशी सलग्न करवीर तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा आज बुधवार दि.०७/०८/२०२४ इ.रोजी संकल्पसिद्धी मंगल कार्यालक पुईखडी, कोल्हापूर येथे माजी गृहराज्‍यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्‍या अध्यक्षतेखाली तसेच संचालक मंडळाच्या उपस्थित पार पडली.

          यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सतेज पाटील म्हणाले की, गोकुळ दूध संघ हि संस्था कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्याची मातृसंस्था असून गेल्या दोन अडीच वर्षात या संचालक मंडळाने माझ्या व मा.मुश्रीफ साहेबाच्या नेतृत्वाखाली काटकसरीचे,बचतीचे धोरण अवलंबले आहे. संघाच्या वार्षिक प्रक्रिया खर्च कमी करून दूध उत्पादक शेतकऱ्याना जादा मोबदला देण्यास आम्ही सर्वजन कठीबद्ध असून दूध उत्पादकांना सर्वाधिक सेवा सुविधा देणारा गोकुळ राज्यातील अग्रगण्य दूध संघ आहे असे मनोगत व्यक्त केले व पुढे बोलताना म्हणाले दुधामध्ये संख्यांत्मक व गुणात्मक वाढ झाली तरच दूध संस्था टिकणार आहेत. संकलनात १८ लाख ३१ हजार पर्यंत आपण पोहोचलो असून राज्यात उच्चांकी गोकुळने गाय दुधाला ३३ रुपये दर दिला आहे, याचा थोडा तोटा संघाला झाला आहे. भविष्यात म्हैस दूध संकलन वाढीसाठी सर्वांनी सहकार्य करावे व कार्यक्षेत्रातील बाहेर जाणारे दूध सर्वांच्या प्रयत्नातून गोकुळकडे वळवले पाहिजे व संकलित झालेले सर्व दूध संस्थांनी संघास पाठवावे असे आवाहन केले.

          यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की, राज्यात गोकुळने दूध उत्पादकांना सर्वाधिक गाय दूध अनुदान मिळवून दिले आहे. त्यामध्ये करवीर तालुका आघाडीवर असून करवीर तालुका सर्वच बाबतीत आघाडीवर आहे त्याच पद्धतीने म्हैस दूध संकलन वाढीसाठी करवीर तालुक्याने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले व संघाने दूध उत्पादकांच्या जातिवंत जनावरांसाठी नवीन उत्पादित केलेले कोहिनूर डायमंड हे पशुखाद्य व आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी वापर करावा. विविध बचतीच्या माध्यमातून दूध उत्पादकांना जास्तीत जास्त त्यांच्या कष्टाचा मोबदला देण्याचे काम गोकुळने केले असल्याचे मनोगत व्यक्त केले.

          यावेळी संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले की, संघाचे गाय दूध संकलनात होत असलेली वाढ हि निश्चितच चिंताजनक आहे. तरी करवीर तालुक्यात संघाच्या विविध योजना तसेच स्व.आनंदराव पाटील – चुयेकर म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रम प्रभावीपणे राबवून म्हैस दूध संकलन वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

          या संपर्क सभेमध्ये संस्था प्रतिनिधी यांच्यावतीने खालील ठराव करण्यात आले-

१.    गायी प्रमाणे म्हैस दुधास शासनाने अनुदान द्यावे.

२.    १० पैसे मॅनेजमेंट व ०५ पैसे कर्मचारी प्रोत्साहन अनुदान संघाने दिल्याबद्दल अभिनंदन.

३.    वैरण विभाग विभागामार्फत मुरघास उपलब्ध केल्याबद्दल संघाचे अभिनंदन.

४.    शासनाचे ५ रुपये गाय दूध अनुदान दूध उत्पादकांना मिळवून देण्यास संघाचे चेअरमन, संचालक व कर्मचारी यांनी बहुमोल सहकार्य केलेबद्दल अभिनंदन.

५.    संस्था इमारत अनुदानात वाढ केलेबद्दल अभिनंदन

६.    नेमबाज स्वप्निल कुसाळे ओलंपिक स्पर्धेत कांस्य पदक मिळवल्याबद्दल अभिनंदन.

७.    स्वर्गीय आमदार पी.एन.पाटील साहेब भावपूर्ण श्रद्धांजलीचा असे ठराव संपर्क सभेमध्ये करणात आले.

          या संपर्क सभेस दूध संस्था प्रतिनिधींनी शिवाजी देसाई (भामटे), सर्जेराव भोसले (सावर्डे), प्रविण पाटील (कावणे), के.डी.पाटील (खुपिरे), नारायण पाटील (भामटे) उपस्थित केलेल्या प्रश्नांना चेअरमन अरुण डोंगळे व जेष्ठ संचालक विश्वास पाटील, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी यांनी समर्पक उत्तरे दिली.

          याप्रसंगी पुर परिस्थितीत दूध संकलन सुरळीत ठेवणारे व उत्कृष्ट कामगिरी केलेल्या संघाच्या विस्तार सुपरवाझर, टेम्पो चालक तसेच बिद्री चिलिंग सेंटरचे शाखाप्रमुख विजय कदम यांचा सत्कार करण्यात आला. किसान विमा पॉलिसी अंतर्गत अपघाती मृत पावलेल्या सभासदांच्या वारसांना व मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना विमा रक्कमेचे धनादेश वाटप करण्यात आले. संकलन, पशुसंवर्धन, वैरण विकास, पशुखाद्य, वित्‍त, मिल्‍कोटेस्‍टर, संगणक, गुणनियंञण या विभागावर सविस्‍तर चर्चा होवून अडचणी समजावून घेवून त्‍या प्रश्‍नांचे निरसन करण्‍यात आले तसेच विविध सूचनाची नोंद घेण्यात आली.

          यावेळी स्‍वागत संचालक बाबासाहेब चौगले व प्रस्ताविक संचालक शशिकांत पाटील–चुयेकर यांनी केले. संचालक बाळासाहेब खाडे यांनी मनोगत व्यक्त केले. तर आभार संचालक प्रकाश पाटील यांनी मानले.

 याप्रसंगी माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील, संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, चेतन नरके, राजेंद्र मोरे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, के.डी.सी.सी.बँक संचालिका स्मिता गवळी व संघाचे अधिकारी तसेच करवीर तालुक्यातील दूध संस्थाचे चेअरमन ,संचालक,प्रतिनिधी,दूध उत्पादक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *