बंदुकीचा धाक दाखवून लाखो रुपये लुटणारी टोळी जेरबंद…

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 43 Second

कोल्हापूर- जावेद देवडी : बंदुकीचा धाक दाखवून लाखो रुपये लुटणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि शाहूपुरी पोलीस यांना यश आले.अभिषेक विजय कागले (रा. युवराज कॉलनी पाचगाव, ता. करवीर ,अशिष निळकंठ कागले (वय ३१, रा. ऋषिकेश कॉलनी पाचगाव), बाळकृष्ण श्रीकांत जाधव (वय ३५ रा. पाचगाव )अमरजीत अशोक लाड (वय ४१, रा. लाईन बाजार, कसबा बावडा) अशी संशयितांच आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून रोख अकरा लाख ३५ हजार दोनशे रुपये ,दोन कार ,एक मोपेड, तीन मोबाईल हँडसेट, एक पिस्तूल, चाकू असा ३२ लाख ३१ हजार ४० रुपये असा मुद्देमाल हस्तगत केला.

अधिक मिळालेली माहिती अशी की १७ ऑगस्ट रोजी शहाजी लॉ कॉलेज जवळ बांधकाम साहित्याची विक्री करणाऱ्या एजन्सीची कार्यालयात l दुपारच्या सुमारास हेल्मेट आणि मास्क घालून आलेल्या तीन ते चार संशयितांनी दुकानातील कामगार लक्ष्मण विलास काणेकर (रा. दौलत नगर) याच्या पोटावर पिस्तूल लावून आणि मानेवर चाकू लावून त्याला चिकट टेपने खुर्चीला बांधले. त्यानंतर चोरट्यांनी गल्ल्यातील १३ लाख २९ हजार ४०० रुपये लुटून नेले. या घटनेची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली होती. एलसीबी आणि शाहूपुरी यांनी संयुक्त या घटनेचा तपास करण्यासाठी आठ पथके तयार केली. गोपनीयरित्या त्यांना माहिती मिळाली की या गुन्ह्यातील तीन संशयित कारमध्ये एकत्र बसून गेल्याची माहिती मिळाली. त्यापैकी पोलीसांनी अभिषेक कागले याला ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अशिष निळकंठ कागले आणि बाळकृष्ण जाधव यांची नावे सांगितली. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन अभिषेक ,आशिष, आणि बाळकृष्ण यांच्याकडे कसून चौकशी केली असता तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्याचा कट अमरजीत अशोक लाड याने रचल्याचे सांगितले .अमरजीत हा पुलाची शिरोली येथील शिर्डी स्टील दुकानात कामगार आहे.पोलिसांनी तपास करून संशयितांकडून रोख अकरा लाख ३५ हजार दोनशे रुपये, दोन कार ,एक मोपेड ,तीन मोबाईल, एक पिस्तूल असा ३२ लाख ३१ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे रवींद्र कळमकर ,शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मसुगटे, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, संदीप जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुळे, एलसीबीचे पोलीस अंमलदार सुरेश पाटील, सागर माने , विजय इंगळे, संजय कुंभार, रामचंद्र कोळी, कृष्णात पिंगळे, विनोद कांबळे, हिंदुराव केसरे, रोहित मर्दाने, अमोल कोळेकर ,विलास किरोळकर, सुनील पाटील, परशुराम गुजरे , अमित सर्जे, संजय पडवळ, दीपक घोरपडे, राकेश राठोड, नामदेव यादव ,शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार संदीप जाधव, मिलिंद बांगर, लखन पाटील, शुभम संकपाळ, संदीप बेंद्रे, महेश पाटील, रवी आंबेकर, बाळासाहेब ढाकणे विकास चौगुले यांचा तपासात सहभाग होता.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *