सांगली पोलिसांची कामगिरी, निलजी येथील जबरी चोरी बलात्कार केलेला गुन्हा उघड आरोपी जेरबंद

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 47 Second

Media control news network

सांगली /प्रतिनिधी, २६/०७/२०२४ रोजी जुना हरीपुर रोड,निलजी येथे फिर्यादी हे घरामध्ये त्यांचे पतीसोबत झोपली असताना रात्री १०.३० वा चे सुमारास संशयीत ४ इसमांनी फिर्यादी यांचे राहते घरामध्ये जबरदस्ती प्रवेश करून त्यांना मारहाण करून सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम जबरदस्तीने चोरून यातील एका आरोपीने फिर्यादी यांचेवर जबरदस्तीने बलात्कार केला असल्याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाणेत वरील प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर यांनी सदर घटनेबाबत माहिती घेवून सदर गुन्हा उघडीस आण्णण्याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करुन सुचना दिल्या असता तसेच मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली व प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज उपविभाग, मिरज यांनी घटनास्थळी भेटी देवून सदर गुन्हा उघडकीस आणणेकरीता वेळोवेळी सुचना व मार्गदर्शन केले होते.

सदर वरील सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक नितीन सावंत, सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पथके तयार करुन सदरचा गुन्हा करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढुन त्यांना ताब्यात घेण्याबाबत आदेश केले होते.

त्या अनुशंगाने दि. २१/०८/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक नितीन सावंत व सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथकातील सपोफौ / अनिल ऐनापुरे, पोहेकॉ / संकेत मगदूम, पोहेकों / इम्रान मुल्ला आणि पोना सोमनाथ गुंडे यांना तांत्रीक तपास व मिळालेल्या बातमीच्या आधारे माहिती मिळाली की, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील निलजी गावात जबरी चोरी करुन बलात्कार केलेल्या गुन्हयातील आरोपी नामे गजपती भोसले हा लिगंनुर ते बेंळकी गावाकडे जाणारे रोडवर फिरत आहे.

नमुद पथक मिळाले बातमीप्रमाणे, लिगंनुर ते बेंळकी गावाकडे जाणारे रोडवरील जलसंपदा कार्यालयाचे बाहेर सापळा लावून थांबले असता, एक इसम संशयीतरित्या फिरताना दिसला. त्याचा मिळालेल्या माहितीप्रमाणे संशय आल्याने पोलीस पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव व गाव विचारले असता, त्यांने त्याचे नाव गजपती शिसफुल भोसले, वय ३० वर्षे, रा. आंबेडकर नगर, बोलवाड, ता. मिरज, जि. सांगली असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे सपोनि नितीन सावंत यांनी निलजी येथे केलेल्या जबरी चोरीच्या गुन्हयाबाबत विचारणा केली असता, त्याने सदर गुन्हा हा त्याचे अन्य साथीदारासोबत केला असल्याची कबुली दिली.

गजपती भोसले हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो मिरज ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. ४५२/२०२३, भा.द.वि.स. कलम ३०२ अन्वये दाखल असलेल्या खुनाच्या गुन्हयात पाहिजे आरोपी असल्याची माहिती मिळाली.

लागलीच सदर आरोपीस पुढील तपास कामी मिरज ग्रामीण पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपासणी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *