संधी मिळाल्यास विधानसभा लढवणार युवा नेते कृष्णराज महाडिक…

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 13 Second

युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी पत्रकार परिषद घेऊन कोल्हापूर विकास कामासाठी राज्य शासनाकडून 25 कोटी विशेष निधी आणल्याचे सांगत आगामी विधानसभा निवडणूकीत संधी मिळाल्यास निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.

कोल्हापूर शहरातील विविध प्रभागातील रस्ते डांबरीकरण, काँक्रीटीकरण, सामाजिक सभागृह, विरंगुळा केंद्र, बगिचा, विद्युत दिवे, हायमास्ट, व्यायाम शाळा अशा पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कृष्णराज धनंजय महाडिक यांनी राज्य सरकारकडून सुमारे २५ कोटी रूपयांचा निधी आणला आहे. याशिवाय कोल्हापूर महापालिकेच्या राजर्षि शाहू जलतरण तलावाच्या दुरूस्तीसाठी आणि सुशोभिकरणासाठी भरीव निधी मंजूर झाला आहे. आजवर कृष्णराज महाडिक यांनी एक यशस्वी फॉर्म्युला थ्री रेसर म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तसेच एक लोकप्रिय व्हिडीओ ब्लॉगर म्हणूनही त्यांनी लौकिक निर्माण केला आहे. या व्हिडीओ ब्लॉगच्या माध्यमातून मिळणार्‍या उत्पन्नाचा विनियोग सामाजिक कामासाठी केला आहे. समाजकार्याची आवड आणि बाळकडू असलेल्या कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर शहर आणि जिल्हयाचे प्रमुख सामाजिक प्रश्न, जनतेच्या अपेक्षा समजून घेवून, त्या सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या अनुषंगाने आजवर त्यांनी कोल्हापूरशी निगडीत प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. राज्य शासनाकडून आलेल्या २५ कोटी रूपयांच्या निधीचा तपशिल पत्रकार परिषदेत मानताना कृष्णराज महाडिक म्हणाले माझ्या जन्मापासून मी पाहत आलोय की आज पर्यंत रस्ते काम उत्कृष्ट दर्जाचे झाले नाहीत असे प्रसार माध्यमातील बातम्या मी नेहमी वाचत आलो आहे जर मला एखादी चांगली संधी मिळाली तर मी कोल्हापुरातील विकास कामात उत्कृष्टपणे काम करीन याचा मला विश्वास आहे. विधानसभा निवडणूक लढवण्या संदर्भात विविध प्रसार माध्यमातून बातम्या मधून माझे नाव प्रसिद्धी होत असते त्या संदर्भात बोलताना कृष्णराज महाडिक म्हणाले मी आजपर्यंत कुठल्याही पक्षाकडे उमेदवारी संदर्भात चर्चा केली नाही व भविष्यात तसे संधी मिळाल्यास मी विधानसभा लढविण्यास मी इच्छुक आहे सामाजिक कार्यात व राजकीय क्षेत्रात आवड असल्याने माझ्या कार्याची दखल घेऊन जनतेकडून प्रतिसाद मिळत आहे.

त्यानंतर पत्रकारांच्या समोर कोल्हापूर शहरामध्ये 25 कोटी निधी कसे खर्च करणार असल्याचे सविस्तर सांगितले एक ऑक्टोंबर पासून विकास कामास सुरुवात होणार आहे.

यावेळी माजी नगरसेवक किरण नकाते रुपा राणी निकम, उमा इंगळे, किरण शिराळे,विलास वास्कर ,निलेश,देसाई,स्मिता माने,बाबा पार्टे,संजय निकम, उदय शेटके, व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *