Share Now
Read Time:1 Minute, 15 Second
डॉ. तारा भवाळकर यांचे निवासस्थानी भेटून केले अभिनंदन
सांगली, दि. ७ :नवी दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान सांगलीला मिळाल्याचा अभिमान आहे. डॉ. तारा भवाळकर यांच्या रूपाने योग्य निवड झाल्याचे समाधान व्यक्त करत कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमात डॉ. भवाळकर यांच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले.
नवी दिल्ली येथे फेब्रुवारी २०२५ मध्ये होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाली. याबद्दल पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी डॉ. भवाळकर यांच्या निवासस्थानी भेटून त्यांचे अभिनंदन केले. डॉ. भवाळकर या सहाव्या महिला साहित्य संमेलनाध्यक्ष आहेत.
Share Now