डोंबिवलीच्या नमो रमो गरब्यास उत्साहात प्रारंभ..

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 22 Second

कोल्हापूर दि, ७

डोंबिवली-मुंबई आणि महाराष्ट्रात डोंबिवलीचा नमो रमो गरबा आता फार प्रसिद्ध झाला आहे. गेली काही वर्ष नमो रमो नवरात्री या नावाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा नवरात्री उत्सवही डोंबिवलीतच साजरा केला जातो त्यात जगप्रसिद्ध गरबा कलाकार येण्यास उत्सुक असतात. यंदा गरबा क्वीन या विशेषणाने संबोधली जाणारी गीताबेन रबारी पुन्हा एकदा नवरात्रीचे नऊ दिवस आपल्या नमो रमो नवरात्रीचा उत्सव रंगतदार करण्यास येणार आहे सोबत ख्यातनाम गरबा गायक निलेश गढवी यांची साथ त्यांना लाभणार आहे. 

नमो रमो नवरात्रीची संकल्पना रुजवणारे आणि सर्व संस्थांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे राहणारे डोंबिवलीचे लोकप्रिय आमदार आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रविंद्र दादा चव्हाण यांच्यामुळेच हा नवरात्री उत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. १२ ऑक्टोबर २०२४ अखेर रोज रात्री ६ ते १० या वेळेत नमो रमो नवरात्री गरबा,सावळाराम महाराज क्रीडा संकुल, घरडा सर्कल, डोंबिवली पूर्व येथे संपन्न होत आहे. 

अतिशय भक्तिभावात हिंदू रीतीप्रमाणे हा सोहळा संपन्न होतो. 

केवळ कल्याण डोंबिवलीच नाही तर ठाणे मुंबई वाशी पालघर आणि मुंबई बाहेरून गरबा खेळण्यासाठी पारंपारिक वेशभूषेत गरबा प्रेमी अवघी तरुणाई या नमो रमो नवरात्रीत उत्साहात सामील होते. ख्यातनाम पुष्परचनाकार श्याम भगत यांच्यातर्फे सजावट करण्यात आली आहे.सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक संजय धबडे ह्यांनी भव्य सेट उभारला आहे. तसेच यावर्षी पूर्ण वातानुकूलित ७० हजार स्क्वेअर फूट प्लेयिंग अरेना आहे. त्यासाठी स्वस्तिक इव्हेंट्सचे अनिल पासड ह्यांनी १३५ फूट बाय ५०० फूट अशा भव्य एसी डोमची निर्मिती केली आहे.टीटू कुलकर्णी ह्यांचा जबरदस्त साऊंड असून मराठी हिंदी गुजराथी रंगभूमी मालिका आणि चित्रपट कलाकार नमो रमो नवरात्री उत्सवात दरवर्षी आवर्जून हजेरी लावत आहेत. या वर्षी दिलीप जोशी, यश सोनी, मल्हार ठाकर, श्रध्दा डांगर, सई मांजरेकर, गष्मिर महाजनी, करण टॅकर, रिधिमा पंडित, जितेंद्र जोशी, उर्मिला कानिटकर, मंजोत सिंघ, आशिम गुलाटी, आर्या जाधव गरबा प्रेमींना भेटण्यास येणार आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *