प्रेस क्लब तर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान, महिला सुरक्षा ही आमची प्राथमिकता: आयुक्त, मंगेश चितळे

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 21 Second

विशेष वृत: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रेस क्लब रायगड/पनवेल तालुका प्रेस क्लब तर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आला. यावेळी पनवेलचे महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, तहसीलदार विजय पाटील, अतिरिक्त आयुक्त कैलास गावडे, पिल्लई कॉलेजच्या निवेदिता श्रेयन्स आणि पनवेल प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले की, देशाचे पंतप्रधान यांनी सांगितले की, महिला सुरक्षा ही प्राथमिकता असून पनवेल महानगरपालिका देखील त्या अनुषंगाने महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महानगरपालिकेमार्फत बनविण्यात येणार्‍या अ‍ॅपमध्ये महिलांसाठी निर्भया हेल्पलाईनचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती दिली.
यावेळी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये निवेदिता श्रेयन्स (पिल्लई कॉलेज), गीतांजली पाटील (अग्नीशमन दल, पनवेल), स्मिता जोशी (उद्योजिका, वीणा वर्ल्ड), स्वप्नाली चौधरी (पनवेल महानगरपालिका), आरती रेवसकर (मंडळ अधिकारी, कळंबोली), अ‍ॅड.सुचिता पाटील (वकील, पनवेल), वर्षा कुलकर्णी (जनसंपर्क अधिकारी, पनवेल महानगरपालिका), साधना पवार (पनवेल शहर पोलीस स्टेशन), शिला सांगळे (मपोना, सायबर पोलीस स्टेशन, नवी मुंबई), तृप्ती पालकर (पत्रकार), रोहिणी कुरंदेकर (उद्योजिका, रोहिणी कॅटरर्स), चित्रलेखा जाधव (उसर्ली, पनवेल), रुपाली हिर्लेकर (निवेदिका), श्‍वेता कुमार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पनवेल तालुका प्रेस क्लबच्या उपाध्यक्ष तृप्ती पालकर, सरचिटणीस दत्तात्रय कुलकर्णी, सहचिटणीस स्वप्नील दुधारे,खजिनदार राकेश पितळे, सल्लागार अनिल भोळे, सुमंत नलावडे, सदस्य जेष्ठ पत्रकार गणेश कोळी, संजय कदम, सचिन भोळे, सन्नी पांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रेस क्लब चे सल्लागार तसेच रंगभूमीकार आणि ज्येष्ठ पत्रकार विजय पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन अध्यक्ष प्रशांत शेडगे यांनी मानले.
कोट
महिलांसाठी येणार्‍या काळात पनवेल महानगरपालिकेतर्फे सुरक्षा आणि रोजगार या संदर्भात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये पर्यावरणपुरक पिंक रिक्षा हा पनवेल महानगरपालिकेचा उपक्रम शासनाकडे मंजूरी पाठविण्यात आला असून लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महानगरपालिका
कोट
आजमितीला महिला सर्वच क्षेत्रात योगदान हे पुरुषांच्या बरोबरीचे किंवा काही क्षेत्रात काकणभर अधिकच आहे. सरकार महिलांसाठी विविध योजना राबवित असून त्यांचा अधिकाधिक फायदा महिलांनी घेण्यासाठी महसूल प्रशासनातर्फे नेहमीच सर्वतोपरी सहकार्य केले जात, असे मत विजय पाटील, तहसीलदार, पनवेल यांनी व्यक्त केले.

_________________जाहिरात_________________

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *