स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचाच भगवा फडकेल, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास.
अनेक मंत्र्यांनी केवळ घोषणा केल्या, मात्र आम्ही विकासकामे करून दाखवली, विरोधकांना टोला

1 0

Share Now

Read Time:7 Minute, 27 Second

कोल्हापूर प्रतिनिधी/ कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचीच सत्ता येईल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. महाडिक यांच्या नियोजनातून नागदेववाडी परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत दलित वस्ती सुधार योजनेसाठी ८५ लाखांच्या निधीतून हाय मास्ट सोलर दिव्यांची यंत्रणा मंजूर केली आहे. जिल्हा परिषद कॉलनी इथल्या या हाय मास्ट सोलर लाईटच्या भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते. येथील अनेक मंत्र्यांनी केवळ घोषणा केल्या. मात्र आम्ही प्रत्यक्ष विकासकामे करून दाखवल्याचा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

खासदार धनंजय महाडिक यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत दलित वस्ती सुधार योजनेसाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्यासाठी ७७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. त्यापैकी ८५ लाखांचा निधी त्यांनी करवीर तालुक्यातील नागदेववाडी गावासाठी मंजूर केला आहे. त्यातून नागदेववाडी परिसरातील दत्तनगर आणि अर्चना पार्कसाठी १० लाख , जय भवानी कॉलनीसाठी २० लाख,शिवरत्न कॉलनीसाठी १० लाख, जिल्हा परिषद कॉलनी आणि दत्त कॉलनीसाठी १५ लाख, शिंदे कॉलनी, शिवतेज कॉलनी, महालक्ष्मी पार्क, अयोध्या कॉलनी आणि ओम पार्क यांच्यासाठी ३० लाख असा एकूण ८५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून नागदेववाडी परिसरात १७ ठिकाणी हायमास्ट सोलर लाईटची उभारणी करण्यात येणार आहे. या हाय मास्ट सोलर लाईटचे एकत्रित भूमीपूजन आणि शुभारंभ शनिवारी नागदेववाडीपैकी जिल्हा परिषद कॉलनीमध्ये श्री नागेश्वर मंदिर परिसरात खासदार धनंजय महाडिक आणि आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी ७७ कोटींचा निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. हायमास्ट लाईटची ही योजना महत्वाकांक्षी असून, जनतेला त्याचा मोठा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. २०१४ सालापूर्वी वेगळ्या विचारांचे सरकार होते. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली भारत देशाची मोठी प्रगती होत असल्याचे त्यांनी सांगितले. भारत देश आता अर्थव्यवस्थेमध्ये पाचव्या क्रमांकावर असून इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठी वाढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले. महायुती सरकारच्या माध्यमातून देशासह कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्ता आता महायुतीच्या ताब्यात येतील, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. येथे अनेक मंत्री झाले त्यांनी केवळ घोषणाच केल्या होत्या. मात्र आम्ही प्रत्यक्ष विकासकामे करून दाखवली असल्याचा टोला यावेळी त्यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरच्या विमानतळासाठी २७४ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे या विमानतळाची नोंद आता आंतरराष्ट्रीय पातळीवर झाल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या १०५ वर्षांमध्ये कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनला कोणताही निधी मिळाला नव्हता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी ४४ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. नागदेववाडी परिसराला आणखी निधी उपलब्ध करून, या परिसराचा विकास केला जाईल, असेही ते म्हणाले. दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्ह्यासह या परिसराचा विकास करण्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे त्यांचे मनःपूर्वक आभार मानत असल्याचे यावेळी आमदार चंद्रदिप नरके यांनी सांगितले. महायुतीच्या माध्यमातून खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्यासह देशांमध्ये मोठी विकासकामे केली आहेत. हे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजपचा आपल्याला मोठा आशीर्वाद लाभल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी अर्चना चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र दिवसे, बी.के.जाधव यांनी मनोगते व्यक्त केली. यादरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी श्री नागेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. तसेच कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी नागदेववाडीच्या सरपंच अमृता पोवार, समीर पोवार, विनय पाटील, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र पोतदार, सगुणा बाटे, डॉ. के.एन.पाटील, विश्वास निगडे, मोहन कांबळे, जिल्हा परिषद कॉलनीचे अध्यक्ष अनंत खोपडे, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य दत्तात्रय आवळे, प्रदीप बाटे, किशोर मुसळे यांच्यासह परिसरातील महिला आणि नागरिक उपस्थित होते.

—————————जाहिरात——————————

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *