प्रतिनिधी, प्रकाश कांबळे / पट्टणकोडोली ता हातकणंगले येथील न्यू राजापूर विद्या मंदिर, या जिल्हा परिषद शाळेतील
शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब पांडुरंग कांबळे यांची तर उपाध्यक्षपदी सौ वैशाली चंद्रकांत कांबळे यांची निवड करण्यात आली
बाबासाहेब कांबळे हे सामाजिक, शैक्षणिक कार्यात सदैव अग्रेसर राहिलेले नेतृत्व आहे. त्यांच्या योग्य विचारसरणीमुळे, प्रभावी वकृत्वशक्ती, दमदार लेखणी, प्रशासनावर असलेली मजबूत पकड आणि स्थानिक ते राज्यस्तरावरील लोकप्रतिनिधींसोबत असलेला उत्तम संपर्क या सर्व गोष्टीचा नक्कीच शाळेसाठी उपयोग होईल,शाळेविषयीची तळमळ, आत्मीयता, वंचित घटकांप्रती असलेली संवेदनशीलता आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळेच ही निवड ही केवळ एक पदनियुक्ती न राहता, शाळा आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठीचे एक प्रभावी पाऊल ठरेल याबद्दल कोणतीही शंका नाही
निवड प्रसंगी बोलताना बाबासाहेब कांबळे म्हणाले की शाळेतील विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना न्याय मिळावा, शैक्षणिक दर्जा उंचावा, आणि वंचित घटकांना संधी उपलब्ध व्हावी यासाठी पर्यंत करणार आहे निवडी बद्दल गावातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
—————————जाहिरात—————————